जिल्ह्यात बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी

0

नंदुरबार । दि.16 । प्रतिनिधी

जांबीपाणी आश्रमशाळा मोदलपाडा

ता.तळोदा । वार्ताहर-

अक्कलकुवा तालुक्यातील जांबीपाणी येथील श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या विद्यावर्धिनी निवासी प्राथमिक आश्रमशाळेत बिरसा मुंडा जयंती निमित्ताने अभिवादानाचा कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक ईश्वर चौधरी होते.
सुरुवातीला बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी शाळेतील शिक्षक हंसराज महाले यांनी विद्यार्थ्यांना आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्याची माहिती सांगितली. त्यांनी बिरसा मुंडा यांची कौंटूंबिक माहिती, इंग्रजांविरोधात पुकारलेले बंड व स्वातंत्र्य लढ्यातील योगदान तसेच त्यांची विचारधारा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मंचावर मुख्याध्यापक ईश्वर चौधरी, अजय पवार, ब्राम्हराज नाईक, महेश रामोळे, महेश सैदाणे आदी उपस्थीत होते. सूत्रसंचलन हरी भारती यांनी केले. महेश वायकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी डी.एन.पाठक, रामकृष्ण शिंदे, राजेश पाडवी, धिरेंद्र वसावे, गणपत वळवी, नानाभाऊ मोरे, पुरुषोत्तम मोरे आदींनी परिश्रम घेतले.

चिनोदा
चिनोदा, ता.तळोदा । वार्ताहर-
चिनोदा येथे बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी राजेंद्र खेत्या पाडवी यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक भिल्लीस्थान टायगर सेनेचे तळोदा तालुका अध्यक्ष राजन पाडवी यांनी केले. तालुका उपाध्यक्ष देविसिंग वळवी यांनी सांगितले की, बिरसा मुंडा यांचा जन्म 15 नोव्हेंबर या रोजी झाला.

तात्कालीन ब्रिटीश सामाज्याला पहिला सुरूंग लावणार्‍या चिंगारीचा उदय झाल्याचा दिवस. बिरसा मुंडा यांनी जन आंदोलनाने ब्रिटीश सरकारची झोप उडाली.

जुलूमशाही विरोधात बिरसा मुंडा यांनी रान उठविले आणि जन आंदोलन उभे केले. आदिवासी जनता जागृत होऊन ब्रिटीश शासनाविरूद्ध उभी ठाकली.

या तेजस्वी ज्योतीने पेटविलेल्या वणव्यासमोर नंतर ब्रिटीशांना नमावे लागले. असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून सांगितले.

कार्यक्रमाला भिल्लीस्थान टायगर सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व चिनोदा गावातील ग्रामस्थ, आदिवासी बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी चिनोदा येथील केशव पाडवी, गोविंद पाडवी, विनोद पाडवी, किसन वसावे, अमरसिंग वसावे, विश्वनाथ नाईक यांनी परिश्रम घेतले. राजेंद्र पाडवी यांनी आभार मानले.

खाज्या नाईक सार्वजनिक वाचनालय
धडगांव । प्रतिनिधी
तालुक्यातील बिजरी येथील शिक्षण प्रतिष्ठान, वीर खाज्या नाईक सार्वजनिक वाचनालय बिजरी यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.

अध्यक्षस्थानी विक्रीकर उपायुक्त भगतसिंग पाडवी होते. याप्रसंगी डीटीएफचे कार्याध्यक्ष डी.एस.वसावे, औषधनिर्माण अधिकारी अनिल पावरा, टीडीएसएफचे सदस्य विजय पराडके, वनरक्षक रंजिता तडवी, गुलाबसिंग पावरा आदी उपस्थित होते.

यावेळी आदिवासी कुलदैवत देवमोगरा माता व वीर बिरसामुंडा यांच्या प्रतिमेच्या पुजनाने शिबीराची सुरूवात झाली. प्राथमिक, माध्यमिक, सिनीअर अशा तीन गटात स्पर्धा परीक्षा घेण्यात आली.

स्पर्धा परीक्षेत यश अजमण्यासाठी 140 स्पर्धकांना भाग घेतला. या स्पर्धा परीक्षेत ज्या, त्या गटातील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विक्रीकर उपायुक्त भगतसिंग पाडवी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्पर्धा परीक्षा उपयोगी पुस्तक देवून सत्कार करण्यात आला.

शिक्षण प्रतिष्ठान बिजरी व वीर खाज्या नाईक सार्वजनिक वाचनालय बिजरी यांच्यावतीने दरवर्षी स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

गेल्या चार वर्षांपासून या गावात सेवाकार्याची धडपड ज्ञानदानाचे कार्य शिक्षण प्रतिष्ठान बिजरीच्या वतीने अविरीपणे सुरू आहे. या प्रतिष्ठानचा हे म्हणजे आदिवासी दुर्गम भागातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे महत्व निर्माण करून दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धा परीक्षेची आस निर्माण करणे, आत्मविश्वासाने खचलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नवी अशा आकांक्षा विश्वास निर्माण करून आदिवासी विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत मोठे यश संपादन करून भविष्यात मोठे अधिकारी घडावे, या प्रामाणिक हेतुने या स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन शिबीर घेण्यात आले.

डी.एस.वसावे यांनी बिजरीकरांनी एक शैक्षणिक क्रांती घडवून आणल्यामुळे भविष्यात विद्यार्थी अधिकारी घणार असल्याचे सांगितले. अनिल पावरा, विजू पाराडके, रंजिता तडवी, गुलाबसिंग पावरा यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक विजय पावरा यांनी केले. सुत्रसंचलन महेंद्र वसावे यांनी केले.

आभार दिलीप पटेले यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी बाबूसिंग पटले, किसन पटले, सुरेश पटले, संदिप पटले आदींनी परिश्रम घेतले.

ब्राम्हणपुरी
ब्राम्हणपुरीी ता. शहादा। वार्ताहर-
खेडदिगर येथे बिसरा मुंडा जयंती साजरी शहादा तालुक्यातील खेडदिगर येथे आदिवासी महानायक बिसरामुंडा जयंती साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सनु मोरे यांच्या उपस्थिती ही जयंती साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाचे उद्घाटन शहादा पं.स. सभापती दरबारसिंग पवार यांच्या हस्ते भगवान बिसरा मुंडाच्या प्रतिमेस पुजन करण्यात आले. यावेळी बिसरामुंडा याच्या जीवन शैल्ीवर इतिहास जनतेसमोर मांडण्यात आला.

शिवाय आदिवासी गीतांनी कार्यक्रमास सुूरूवात झाली. कार्यक्रमाचे प्रस्तावना आदिवासी साहित्यिक जेलसिंग पावरा यांनी केले. प्रमुख पाहूणे म्हणून नामदेव पटले, वनिता पटले, इंदूबाई सोनवणे, सुभाष नाईक, डॉ.मनिलाल शेल्टे, रविंद्र मुसळे, अनिल कुवर आदी मान्यवर उपस्थित होते.

यशस्वीतेसाठी खेडदिगर सरपंच अविनाश मुसळदे, कृषी अधिकारी सुनिल सुळे, रवि पटेल, उदय वळवी, चंपालाल भंडारी, मनोहर खर्डे, कोचराचे सरपंच संपत ठाकरे, डॉ. नितीन पवार आदी परिश्रम घेतले.

कार्यक्रमात विविध मान्यवरांनी या महानापयक विषयी विविध माहिती दिली. कार्यक्रमात आदिवासी संस्कृतीची जतन केली. पाहिजे अशा विविध विषयांवर हा कार्यक्रम झाला.

LEAVE A REPLY

*