सुलतानपूर-खरगोन रस्त्याची चाळण रस्ता दुरुस्त करण्याची वाहनधारकांची मागणी

0

ब्राम्हणपुरी । दि.16 । वार्ताहर-ब्राम्हणपुरी ता. शहादा। वार्ताहर – शहादा तालुक्यातील सुलतानपूर येथे खरगोन रस्त्याची दूरवस्था झाली आहे.

खड्डयामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत. हा मार्ग गणोर, आडगाव, मुबारकपूर, बहरपूर आदी गावांना जोडलेला असल्याने या रस्त्यावरून सातत्याने वर्दळ असते.

नादुरूस्त रत्यामुळे अपघाताची संख्या तसेच वाहनात बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडून यात पाणी साचते.

रस्ता पुर्णपणे उखडला गेल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. खेतीया येथे आठवडा बाजार भरवतो या ठिकाणी लावण्यासाठी परिसरातील लोक आठवडे बाजारासाठी येण्या जाण्यासाठी याच मार्गाचा वापर करतात.

हा रस्ता दुरूस्ती करावा अशी मागणी शहादा भाजपा तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, उपाध्यक्ष संतोष पाटील, शहादा तालुका युवा मोर्चा भाजपा उपाध्यक्ष विनोद पाटील, आडगावचे पंडीत पराडके, खरगोन सरपंच शंकर पवार आदींनी केली आहे. वेळोवेळी

हा रस्त दुरूस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*