पीस पोस्टर स्पर्धेत मनोज पवार प्रथम

0

नंदुरबार । दि.15 । प्रतिनिधी-येथील लायन्स क्लबतर्फे पीस पोस्टर स्पर्धा घेण्यात आली. यात 85 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत मनोज पवार प्रथम, खुशी पाटील द्वितीय तर पियुष महाजन याने तृतीय क्रमांक पटकाविला.

लायन्स क्लबतर्फे दरवर्षी जागतिक शांतता या विषयावर जागतिक पातळीवरील चित्रकला स्पर्धा घेण्यात येते. यावर्षी श्रॉफ हायस्कुल येथे ही स्पर्धा घेण्यात आली.

यावेळी स्पर्धेत विविध शाळेतील 85 विद्यार्थ्यांना आपला सहभाग नोंदविला. 11 ते 13 वर्ष वयोगटातील मुलांच्या मनात जागतिक शांतता या विषयावर काय कल्पना, विचार आहेत ते पोस्टरच्या माध्यमातून शोधले जाते.

सर्वप्रथम चित्र पुढील निवडीसाठी अमेरिकेपर्यंत जात असते. पाच हजार अमेरिकन डॉलर्स असे मोठे बक्षिस आणि अमेरिका ट्रीप ही त्या चित्रकारासह पालकांना मिळते.

स्पर्धेच्या सुरुवातीला परीक्षक चंद्रशेखर चौधरी यांनी विद्यार्थ्यांना चित्राबाबत मार्गदर्शन केले. स्पर्धेत श्रॉफ हायस्कुलचा विद्यार्थी यश मनोज पवार (इ.6 वी-ड) याने प्रथम क्रमांक पटकाविला.

तर द्वितीय क्रमांक डॉ.काणे गल्स हायस्कुलची विद्यार्थीनी खुशी चंद्रशेखर पाटील (इ.6 वी-अ) हिने पटकाविला. तृतीय क्रमांक श्रॉफ हायस्कुलचा विद्यार्थी पियुष दिनेश महाजन (इ.6 वी-ब) याने पटकाविला.

परीक्षक म्हणून चंद्रशेखर चौधरी व धनंजय खंडारे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे संयोजन श्रीराम दाऊतखाने, जितेंद्र जैन, दिनेश वाडेकर. शंकरभाई रंगलानी, आनंद रघुवंशी, रविंद्र पोतदार, आशिष कापडणीस आदींनी केले. यावेळी लायन्सचे सदस्य व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*