उधना – जळगाव रेल्वे मार्गावरील 12 गाडया 5 दिवस रद्द

0
भुसावळ :  पश्चीम व मध्य रेल्वे दरम्यान जळगाव- उधना रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरी करणाच्या तिसया टप्प्याचे काम सुरू असल्याने 16 ते 21 नोव्हेंबर दरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. या दरम्यान 12 गाडया रद्द करण्यात आल्या आहेत.तर काही गाडयांचे मार्ग तात्पुरते बदल करण्यात आले आहेत.

सुरत-भुसावळ, भुसावळ – सुरत पॅसेंजर गाडी क्र. 59013, 59014, 59077, 59078,59075, 59076  या गाडया 16 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर पर्यंत रद्द करण्यात आल्या आहेत.

तर  19 नोव्हेंबर रोजी गाडी क. 19025 व 19026 सुरत – अमरावती फास्ट पॅसेंजर तसेच  मुंबई मार्गावरील गाडी क्र. 51154 व 51153 भुसावळ- मुंबई व मुंबई – भुसावळ पॅसेंजर, गाडी क्र. 51181 व गाडी क्र. 51182  देवळाली – भुसावळ पॅसेंजर  21 रोजी रद्द करण्यात आली आहे.

तर 19 रोजी गाडी क्र. 12656 चैन्नई – अहमदाबाद  नवजीवन एक्सप्रेस  ही गाडी इगतपुरी – कल्याण- भोईसर मार्गे  वळविण्यात आली आहे. 21 नोव्हेंबर रोजी गाडी क्र. 22938 रेवा – राजकोट  व्हाया भोपाळ ही गाडी नागरा- बडोदा मार्गे वळविण्यात आली आहे.12656 चैन्नई-अहमदाबाद ही गाडी भुसावळ- इगतपुरी-कल्याण-भोईसर मार्गे वळविण्यात आली आहे.

22948 भागलपूर – सुरत तापी गंगा एक्सप्रेस ही गाडी भोपाळ-नागदा-बडोदा,12833 अहमदाबाद – हावडा एक्सप्रेस भोईसर- कल्याण-इगतपुरी मार्गे, 19063 उधना –दानापूर एक्सप्रेस सुरत-नागरा- भोपाळ मार्गे, 22828 सुरत-पुरी एक्सप्रेस भोईसर – कल्याण – इगतपूरी मार्गे, 22947 सुरत- भागलपूर एक्सप्रेस  ही गाडी सुरत-नागदा- भोपाळ मार्गे वळविण्यात आली आहे.

तसेच गाडी क्र. 12833 अहमदाबाद-हावडा एक्सप्रेस ही गाडी 19 रोजी 2 तास 30 मिनीटे उशिराने सुटणार आहे.  21 रोजी अहमदाबाद – चैन्नई  नवजीवन एक्सप्रेस ही गाडी 1 तास 30 मिनीटे उशिराने धावेल. तर 22664 जोधपूर –चैन्नई ही गाडी 1 तास उशिराने सुटेल.

LEAVE A REPLY

*