ट्रॅक्टरखाली दबल्याने दोन शेतकर्‍यांचा मृत्यू

0

नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-नवापूर तालुक्यातील डोकारे गावाजवळील सरपणी नदीकिनारी ट्रॅक्टर पलटी होवून त्याखाली दबल्याने दोन शेतकर्‍यांच्या जागीच मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर तालुक्यातील उमराण गावातील दोन शेतकरी आपले ट्रॅक्टर घेवून शेती कामासाठी गेले होते.

संध्याकाळी शेतीकाम उरकून 5 वाजेच्या सुमारास सरपणी नदीकिनारी खडतर रस्त्याने येत असताना ट्रॅक्टर चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे अपघात झाला.

ट्रॅक्टर कॅबिनवर स्वार असलेले अविनाश जयसिंग वसावे (वय 23) व सहचालक मोहन शिपड्या वसावे (65) दोन्ही रा.उमराण ता.नवापूर हे ट्रॅक्टरखाली दबले गेले.

त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच जवळील शेतात काम करणारे शेतकरी मदतीला धावून आलेत. ट्रॅक्टरखाली अडकलेल्या ले दोघांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले.

मात्र, पुरेसे साधन जवळ नसल्याने त्यांना बाहेर काढण्यास उशीर झाल्याने त्यांच्या घटनास्थळीच मृत्यू झाला. याबाबत नवापूर पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. दोघांचे शवविच्छेदनासाठी नवापूर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.

LEAVE A REPLY

*