शौचालय बांधणे कायद्याने बंधनकारक – डॉ.कलशेट्टी

0

धडगांव । दि.14 । प्रतिनिधी-पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत मिशन या योजनेला जोड देवून विकास मोहिमेला कृतीत आणणे तेवढेच गरजेचे आहे.

यासाठी आपण सगळयांनी सकारात्मक प्रयत्न करावेत. सर्व सरकारी कर्मचारी व नागरीकांना शौचालय बांधणे कायद्याने बंधनकारक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले.

येथील एस.व्ही.ठकार महाविद्यालयाच्या सांस्कृतीक हॉलमध्ये हागणदारीमुक्तीसाठी स्वच्छ भारत मिशनची आढावा बैठक झाली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.

तालुक्यातंर्गत येणार्‍या ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारी, सरपंच उपस्थित होते. जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवाडे, अतिरीक्त मुख्याधिकारी बी.एम.मोहन, उपमुख्याधिकारी सारीका बारी, तहसिलदार श्याम वाडेकर, गटविकास अधिकारी बनकुढे, ग्रामविकास अधिकारी, सरपंच, ग्रामप्रवर्तक, तलाठी, अंगणवाडी सेविका उपस्थित होते.

डॉ.कलशेट्टी म्हणाले की, धडगांव तालुक्यासारख्या अतिदुर्गम भागातील नागरीकांना स्वच्छतेचे महत्व समजून घ्यावे. धडगाव तालुका पूर्ण हागणदारीमुक्त व्हावा, यासाठी सहकार्य करावे.

या तालुक्याचे आरोग्य सुदृढ राहणे आवश्यक आहे. दुर्गम भागातील मुलांच्या कुपोषणाचा प्रश्न भेडसावत आहे. उघडयावर शौचास गेल्यास पूर्ण गावाचे आरोग्य धोक्यात येते.

म्हणून प्रत्येकाने गावाच्या परिसर स्वच्छ आणि सुंदर हागणदारीमुक्त करण्यासाठी सगळयांनी एकत्र येवून संकल्प करणे गरजेचे आहे. याची जाणीव झाली तर गाव परिसर स्वच्छ दुर्गंधीयुक्त होण्यास मदत होईल. स्वतःच्या सवयींमध्ये सकारात्मक बदल करावा. भारत मिशन बैठक्ीच्या आढावा घेण्यात आला.

डॉ.कलशेट्टी म्हणाले की, मानव विकास योजनेमध्ये धडगाव तालुक्याचा स्तर खालावला आहे. आरोग्याचा प्रश्न, विकास, स्वच्छता, आरोग्य शिक्षण यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून सगळयांनी ही जबाबदारी स्विकारण्याची गरज आहे.

जिल्हाधिकारी या नात्याने धडगांव तालुका दत्तक घेतला आहे. आपण स्वजबाबदारीने कर्तव्य म्हणून सामाजिक भान जपण्यासाठी पर्यावरणाच्या संतुलनासाठी कुटूंबातील जबाबदारी निभावण्यासाठी, पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी, गाव दुर्गंधीमुक्त करण्यासाठी सगळयांनी एकत्र यावे, असे आवाहन केले.

प्रत्येकाने मार्चपर्यंत 100 टक्के शौचालय बांधून त्याचा वापर करावा अशा सूचना केल्या. यावेळी विविध विभागाच्या अधिकार्‍यांनी आढावा सादर केला. यावेळी नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*