ढोंगसागाळी येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन

0

नंदुरबार । दि.14 । प्रतिनिधी-नवापूर तालुक्यातील ढोंगसागाळी येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन प्रकल्पाधिकारी मिना अरोरा यांच्या हस्ते झाले.

यावेळी प्रमुख पाहूणे सरपंच उषाबाई कोकणी, उपसरपंच संजय कामठे होते. यावेळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी आर.डी.केदार, रमेश पाडवी, टी.डी. वसावे, एन.एम.साबळे, निरीक्षक एन.आर.नाईक, मंगला वळवी, विस्तार अधिकारी सी.जी.पाटील, एस.आर.कोकणी, आर.एस. निकम, पी.एम.वसावे, के.एन. गावीत, संदिप वळवी, प्राचार्य ए.वाय. कोकणी, मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक उपस्थित होते.

प्रास्ताविक प्राचार्य ए.वाय.कोकणी यांनी केले. प्रकल्पाधिकारी मिना अरोरा यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्रत्येक खेळाडूने आपल्या योग्य गुणवत्तेवर यश संपादन करावे व प्रकल्पाचे नाव उंचावे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धेत एकूण 1029 खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे.

क्रीडा प्रकारात खो-खो कबड्डी, व्हॉलीबॉल, हॅण्डबॉल व मैदानी स्पर्धा आहे. क्रीडा स्पर्धा यशस्वी होण्यासाठी समित्यांचे सदस्य ढोंगसागावी आश्रमशाळेचे कर्मचारी परिश्रम घेत आहेत. सुत्रसंचलन प्रा.एम.ए.बागले व अर्चना जगताप यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*