Type to search

maharashtra आवर्जून वाचाच नंदुरबार

गावे पाणीदार करण्यासाठी सरसावले हजारो हात

Share
नंदुरबार । दि.8। प्रतिनिधी :  देशात लोकसभेची धामधुम सुरू असतांना जिल्ह्यातील 173 गावे गाव पाणीदार करण्यासाठी सरसावले असुन यंदा पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभागी झाले आहेत. स्पर्धेला दि. 7 एप्रिलच्या मध्यरात्रीपासुन सुरुवात झाली.यात विवीध गावांनी रात्री 12 वाजुन 1 मिनीटांनी विवीध उपक्रमाव्दारे स्पर्धेचा शुभारंभ केला.

गेल्या वर्षापासून जिल्ह्यात पाणी फाउंडेशनतर्फे वॉटर कप स्पर्धा सुरु करण्यात आली होती. पहिल्या वर्षात मिळालेला प्रतिसाद दुसर्‍या वर्षीही कायम असून श्रमदानातून जलसंधारण ही संकल्पना यंदाही राबवली जात आहे. नंदुरबार तालुक्यातील 102 गावे स्पर्धेत सहभागी झाली आहेत.

यासाठी 261 पुरुष आणि 237 महिलांनी प्रशिक्षण पूर्ण केले आहे. शहादा तालुक्यातील 71 गावातील 261 पुरुष आणि 93 महिला प्रशिक्षणात सहभागी झाल्या होत्या. त्यांना जलसंधारणबाबत माहिती देण्यात आली होती.दि.7 एप्रिल रोजी मध्यरात्रीपासून नंदुरबार तालुक्यातील वावद, तिसी, कार्ली, ढंढाणे, मांजरे, बलदाणे, कोठली खुर्द, अजेपूर, कोठडे, केसरपाडा, शिवपूर, पथराई, लोय, जळखे, धमडाई, नगाव तर शहादा तालुक्यात मानमोड्या, जयनगर, नवानगर, जाम, गोगापूर, काथर्दै खुर्द, अंबापूर, कहाटूळ, लोंढरे, कोळपांढरी, कोठली तर्फे सारंगखेडा, कानडी तर्फे शहादा (खुर्द), धांद्रे (खुर्द) कळंब, हिंगणी आणि भुलाणे येथे विविध जलसंधारणाच्या कामांना सुरुवात होणार आहे.

दरम्यान नंदुरबार तालुक्यातील कोठली खुर्द येथे वॉटर कप स्पर्धेचा शुभारंभ रात्री 12 वाजून 1 मिनीटांनी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक सजंय पाटील,जिल्हा परीषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,गटविकास आधिकारी अशोक पटाईत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनिष सांगळे , अनिकेत पाटील,प.पू.जिज्ञासा दीदी, सहा.गटविकास अधिकारी दिनेश वळवी,उपशिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी,ग्रामविस्तार अधिकारी वाय.डी.पवार,ग्रामविकास अधिकारी आर.डी.पवार,पाणी फाउंडेशनचे सुकदेव भोसले,आणि इतर अनेक प्रशासनिक अधिकारी श्रमदान सोहळ्यात उपस्थित होते.

सुरवातीस गांवातून सवाद्य मशाल रॅली काढण्यात आली.यात तगतराव,बैलगाड़ी,टॅक्ट्रर,व ग्रामस्थ,तसेच महिला व युवती सहभागी झाल्या होत्या.श्रमदानापूर्वी साहीत्याचे पुजन व दुष्काळरूपी रावणाचे दहन जिल्हाधिकारी मंजुळे याच्या हस्ते करण्यात आले.नंतर जिल्हाधिकारी यांनीश्रमदान करून या स्पर्धेचा शुभारंभ केला.यावेळी 2 ते 3 हजार ग्रामस्थ उपस्थित होते.याप्रसंगी गावातील पाणी फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक रोहीदास पाटील,सागर शांतीलाल पटेल,विलास पाटील,शिरीष पाटील,प्रल्हाद पाटील,आदी उपस्थीत होते.सुत्रसंचलन वाय.डी.पवार तर आभार योगेश पाटील यांनी मानले.

दरम्यान 1 मे पासून अधिकारी गावांना भेटी देऊन श्रमदान करणार जिल्हास्तरीय अधिकारी 1 मे पासून सत्यमेव जयते वॉटर कपस्पर्धेत सहभागी गावांना आठवड्यातील तीन दिवस भेट देऊन श्रमदानात सहभागी होतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी केले.श्री. मंजुळे म्हणाले, प्रशासन, नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या एकत्रीत प्रयत्नातून जिल्ह्याला दुष्काळ मुक्त करणे शक्य आहे.

दुष्काळावर मात करण्यासाठी लोकसहभाग महत्वाचा आहे. ग्रामीण भागातील जनतेने पाण्याचे महत्व जाणले असून दुष्काळावर मात करण्यासाठी गाव एकत्र येणे ही स्तुत्य बाब आहे, असे त्यांनी सांगितले. कोठली गावातील नागरिकांनी श्रमदानात उत्स्फुर्त सहभाग घेतल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांनी त्यांचे अभिनंदन केले.

मध्यरात्री कोठली खुर्द गावातील ग्रामस्थांनी एकत्र येऊन मशाल फेरीचे आयोजन केले. शिवारात दुष्काळाचे प्रतिकात्मक दहन करण्यात येऊन ग्रामस्थांनी दुष्काळ मुक्तीचा संकल्प केला. गावातील नागरिकांत श्रमदानाबाबत उत्साह दिसत होता. एकत्र येऊन गाव पाणीदार करण्यात आणि राज्य पातळीवर गावाचे नाव पोहोचविण्यात ग्रामस्थ यशस्वी होतील, असा विश्वास जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी व्यक्त केला.

तिशी दुष्काळ रुपी रावनाला दहन

नंदुरबार तालुक्यातील तिशी येथे वॉटर कप स्पर्धेच्या शुभारंभ प्रसंगी गावातील नागरीकांना अक्षदा वाटून रात्री 12 वाजता श्रमदानाचे आमंत्रण देण्यात आले. यासह दुष्काळरूपी रावणाचे दहनही करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!