राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत रिद्धी सिंगवीला सुवर्णपदक

0

नंदुरबार । प्रतिनिधी-येथील श्रॉफ हायस्कुलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी कु.रिद्धी राजेंद्र सिंघवी हिने छत्तीसगड येथे झालेल्या राष्ट्रीय शालेय रोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या खेळासाठी रिद्धीची सलग तिसर्‍यांदा निवड झाली आहे.

जिल्हास्तरीय मुलींच्या जिल्हास्तरीय रोलबॉल सामन्यात रिद्धी सिंगवी (कर्णधार) हिच्या नेतृत्वाखालील श्रीमती हि.गो.श्रॉफ हायस्कूलच्या संघाने एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम स्कूलला नमवत नाशिक विभागीय शालेय रोलबॉल क्रीडा स्पर्धेत दाखल झाला.

त्यानंतर नाशिक येथे झालेल्या विभागस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेत टेरेसा हायस्कूल जळगांवला 3-0 ने नमवत श्रॉफ हायस्कूलच्या मुलींचा संघ राज्यस्तरीय स्पर्धेत दाखल झाला होता.

नंदुरबार येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय रोलबॉल स्पर्धेत श्रॉफ हायस्कूलच्या 14 वर्ष आतील मुलींच्या संघाने नेत्रदीपक कामगिरी करीत कांस्य पदक पटकविले. त्यात रिद्धी सिंगवीची राष्ट्रिय संघात सलग तिसर्‍यांदा निवड झाली. यात सानिका देसले हिस राखीव म्हणून राष्ट्रीय संघात स्थान मिळविले.

63 व्या शालेय राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत लीगमध्ये हरियाणाला 8-2 ने नमवत गर्ल ऑफ द मॅचचा पुरस्कार रिद्धी सिंगवीला मिळाला होता.

सेमी फाइनलमध्ये झारखंडला 8-1 ने नमवत महाराष्ट्र मुलींच्या संघाचा फाइनल मध्ये दाखल झाला. फाइनलमध्ये गुजरातला 11-1 ने नमवत महाराष्ट्र मुलींच्या संघ सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला.

त्यानंतर छत्तीसगड येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने कु.रिद्धी सिंगवी हिच्या नेतृत्वाखाली कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. या खेळासाठी रिद्धीची सलग तिसर्‍यांदा निवड झाली आहे. या यशाबद्दल चेअरमन रमणभाई शाह, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुषमा शाह, क्रीड़ा शिक्षक राजेश शाह, प्रशिक्षक नंदू पाटिल व सचिन सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले.

रिद्धीचे नंदुरबार येथील रेल्वे स्थानकावर आगमन झाले त्यावेळी तिचे जोरदारस्वागत करण्यात आले.

 

LEAVE A REPLY

*