रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा

0

नंदुरबार । दि.13 । प्रतिनिधी-नंदुरबार शहरात वाहन व हातगाडी रस्त्यात उभी करून रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी चौघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील मंगळबाजार, नेहरुपुतळा, नगरपालिका परिसरातील रस्त्यावर ये-जा करणार्‍या नागरीकांच्या जिवीतास धोका निर्माण होईल व रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत वाहन व हातगाडी उभी करून व्यवसाय करणार्‍या रियाज गफ्फारभाई खाटीक रा.बागवान गल्ली नंदुरबार, फारुख शेख रियाज हवाई रा.मन्यार मोहल्ला नंदुरबार, मुश्ताक फत्तू लहवाई रा.घोडा पीर मोहल्ला नंदुरबार व करण जयसिंग गोसावी रा.गोसावीवाडा, विसरवाडी ता.नवापूर यांचेविरूद्ध भादंवि कलम 283 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, शहर वाहतुक शाखेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईचे नागरीकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*