नर्मदा परिक्रमेनिमित्त आजपासून दिग्विजयसिंह नंदुरबार जिल्ह्यात

0

नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री तथा अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिग्विजयसिंह हे नर्मदा परिक्रमेनिमित्त उद्या दि. 12 ते 18 नोव्हेंबरदरम्यान नंदुरबार जिल्हयात येणार आहेत.

दिग्विजयसिंह यांनी मध्यप्रदेश येथून नर्मदा परिक्रमेला पायी कुटूंबासह सुरूवात केली आहे. हा संपूर्ण प्रवास सहा महिन्यांचा असून या मार्गात येणार्‍या ठिकाणी ते भेटी देत असून कार्यकर्ते, सामान्य नागरीक यांच्या भेटीगाठी घेत आहेत.

उद्या दि.12 रोजी सायंकाळी 7 वाजता त्यांचे राणीपूर (ता.शहादा) येथे आगमन होणार असून रात्री दिपक पाटील यांच्याकडे ते मुक्कामी राहणार आहेत.

दि.13 रोजी सकाळी राणीपूर येथून प्रस्थान करून पिंपराणी ता.शहादा येथे विक्रम पाडवी यांच्याकडे विश्राम करणार आहेत. सायंकाळी 5.30 वाजता उनपदेव येथे गरम पाण्याचा झरा व महादेवाच्या ऐतिहासीक प्राचीन मंदिराला भेट देवून रात्री मुक्काम करणार आहेत.

दि.14 रोजी धावलघाट ता.अक्राणी, सायंकाळी काकडदा ता.अक्राणी येथे मुक्काम, दि.15 नोव्हेंबर रोजी काकडदा येथून नणंदभावजायी येथे भेट, सायंकाळी टेभुर्णी येथे भेट व रात्री मुक्काम, दि.16 नोव्हेंबर रोजी मुंगबारी, धडगांव, सुरवाणी येथे भेट व रात्री मुक्काम, दि.17 रोजी कुंडल ता.अक्कलकुवा, दाबपाई, खुंटमोडी येथे भेट, दि.18 रोजी दाबपाई, खुंटामोडी येथून मोलगीकडे प्रस्थान तेथून सुरगस ता.अक्कलकुवा येथे मुक्काम, त्यानंतर गुजरात राज्याकडे ते प्रस्थान करणार आहेत, अशी माहिती आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी दिली.

LEAVE A REPLY

*