नवापुरात तीन डॉक्टरांमध्ये होणार नगराध्यपदाची लढत

0

प्रकाश खैरनार , नवापूर । दि.11-येथील नगराध्यक्ष पद हे सर्वसाधारण महिला राखीव असून यासाठी शहरातील तीन महिला डॉक्टर इच्छूक आहेत. या तिघांपैकी कोण नगराध्यक्षपदी विराजमान होतो, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.

नवापूर पालिकेची निवडणुकीसाठी विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांनी आपली मोर्चे बांधणी सुरू केली असून राजकिय पक्षांचे कार्यकर्ते आपपल्या परिने विविध ठिकाणी सभा सभारंभात व भेटेेल त्या कार्यकर्त्याला जवळ करून आपलेसे करण्याच्या प्रयत्नात दिसत आहेत.

निवडणूक आयोगाने नगराध्यक्ष पद हे महिला सर्वसाधारण असल्यामुळे बर्‍याच आजी-माजी नगरसेवकांनी पक्षश्रेष्ठींकडे मोर्चेबांधणी सुरू झाली असून आपल्यालाच तिकिट मिळेल या विश्वासाने सर्व काही व्यवस्थीत सुरू आहे.

विशेष म्हणजे आतापर्यत पालिकेच्या इतिहासात प्रा.सौ.विजया सोनार, प्रा.नवलभाउ पाटिल व माजी उपनगराध्यक्षा व तत्कालीन नगरसेविका प्रा.सौ.ज्योती जयस्वाल सारख्या शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींनी निवडणुक लढविली व विजय मिळविला. व्यापारी व शिक्षकांनी नगरसेवक पद भुषविले आहे.

दुसरीकडे व्यापारी व सेवानिवृत्त कर्मचार्‍यांनी पालिका निवडणुकित आपले नशिब अजमावले व विजयी देखील मिळविला. मग डॉक्टरांनीच का मागे रहावे असे देखील काहिंचे मत आहे.

त्यामुळे संधी आली आहेच तर फायदा घ्यायला काय हरकत आहे असाही विचार ही मंडळी कदाचित करत असेलच म्हणुनच की काय यावेळेस आरोग्याचे रक्षक व सर्वाना निरोगी ठेउन आरोग्याचे काम करणारी डॉक्टर मंडळीदेखील महिला थेट नगराध्यक्ष पदाची निवडणुक लढवण्याची शक्यता आहे.

एक-दोन नव्हे तर तीन-तीन महिला डॉक्टर नगराध्यक्ष पदासाठी सरळ सरळ रिंगणात उतरण्याचे चित्र दिसत आहे. याबाबत नागरिकांमध्ये चर्चा रंगत आहे.

विशेष म्हणजे या तिन्ही डॉक्टरांना राजकिय वारसा आहे. या तिन्हह उमेदवारांमधून दोन्ही डॉक्टरांचा व्यवसाय जोरात असुन जवळ जवळ पदवी देखील सारखीच आहे.

विशेष आपल्या चांगल्या सेवेमुळे बरेचसे पेशन्ट व त्यांचा नातेवाईकांशी अत्यंत जवळचे संबंध आहेत. सोबत पेशन्टच्याा परिवाराचीदेखील मदत यांनाच मिळू शकते.

त्यामुळे या ना त्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. तिसर्‍या डॉक्टरची पदवी वेगळी असली तरी सामाजिक कार्यातील सहभाग व परिवाराचा जनसंपर्कमुळे विजयी होण्याचे संकेत पाहत आहेत.

नवापूर पालिकेचे नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी निश्चित असून या तिन्हींमधुन कोणाचे नशिब जोर धरते, मतदार राजा व पक्ष श्रेष्ठिदेखील कुणाला संधी देतात व कुणाला पदासाठी योग्य समजतात, ते येणारा काळच ठरवणार आहे

LEAVE A REPLY

*