एमआयएमचे ओवैसी व समाजवादीचे आझमी काँग्रेसचेच एजंट

0

नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-एम.आय.एम.चे अध्यक्ष खा.असदुद्दीन ओवैसी व समाजपार्टीचे आ.अबु आझमी हे काँग्रेस पक्षाचे एजंट असून त्यांनी समाजासमाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सुरू केले आहे.

अशा प्रवृत्तींपासून अल्पसंख्यांक समाजाने सावध रहावे असे आवाहन भाजपा अल्पसंख्यांक सेलचे प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी पत्रकार परिषदेत केले.

येथील हॉटेल हिरा एक्झीक्युटीव्ह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. श्री.सिद्दीकी म्हणाले, जिल्ह्यातील नंदुरबार, तळोदा व नवापूर या तिन्ही नगरपालिकांमध्ये भाजपा अल्पसंख्यांक सेल पूर्ण ताकदीने उतरणार आहे.

आतापर्यंत काँग्रेसच्या फक्त नाकर्तेपणा पहायला मिळाला आहे. त्यांनी फक्त अल्पसंख्यांक समाजाचा वापर केला आहे. एमआयएमचे अध्यक्ष खा.असदुद्दीन ओवैसी व समाज वादी पार्टीचे आ.अबु आझमी हे दोघी काँग्रेसचे एजंट असून ते दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत आहे.

त्यांचे हे दुटप्पी धोरण अल्पसंख्यांक समाजाने जाणले आहे. त्यामुळे अल्पसंख्यांक समाजाने ओवैसी व आझमी यांच्यापासून सावध राहण्याची गरज आहे.

भाजपाने गेल्या तीन वर्षात अल्पसंख्यांक समाजाबाबत अनेक चांगले निर्णय घेतले असून अल्पसंख्यांकाच्या शिक्षणावर या सरकारचा भर आहे.

भाजपासाठी हिंदूंएवढेच मुस्लिम व इतर समाज महत्वाचे आहेत. या सर्व समाजमध्ये सुसंवाद साधण्याचे काम भाजपाने सुरु केले आहे. त्यामुळे यापुढे देखील सर्व निवडणुकीत भाजपालाच यश मिळेल असा विश्वास श्री.सिद्दीकी यांनी व्यक्त केले.

 

 

LEAVE A REPLY

*