शहादा येथे मारहाणप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा

0

नंदुरबार । प्रतिनिधी-शहादा शहरातील काशिनाथ मार्केटच्या मागील बाजूस हातात धारदार शस्त्रे घेऊन परस्परांशी झोंबाझोंबी करणार्‍या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.9 रोजी शहादा शहरातील काशिनाथ मार्केटच्या मागील बाजूस मियॉ जालम सोनवणे, दिपक मियॉ सोनवणे, संजय जगनसिंग गिरासे सर्व रा.पिंपळोद ता.शहादा हे आपल्या हातात लोखंडी धारदार पात्याच्या धार्‍या, लोखंडी धारदार पात्याची काळ्या रंगाच्या गोल पाईपात असलेली गुफ्ती व कुर्‍हाड घेूवन एकमेकांशी झोंबाझोंबी करून मारहाण करतांना आढळून आली.

याप्रकरणी पोलीस नाईक विकास कापुरे यांनी शहादा पोलीस ठाण्यात तिघांविरूद्ध फिर्याद दिल्यानुसार भादवि कलम 160 व आर्म अ‍ॅक्ट कलम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहा.पोलीस निरीक्षक जाधव करीत आहेत.

 

LEAVE A REPLY

*