स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे रविवारी हिवाळी बालसंस्कार शिबिर

0

नंदुरबार । दि.09 । प्रतिनिधी-येथील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्रातर्फे दि. 12 नोव्हेंबर सकाळी 8 ते 4 वाजेदरम्यान सर्व शालेय विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

चौपाळे शिवारातील अध्यात्मिक प्रकल्पासह शहादा, धडगाव, खापर, शनिमांडळ, भालेर, कलमाडी, जोगशेलू व साक्री येथे ही शिबीरे होणार आहेत. संपुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी व एकाच वेळी हे शिबीर होणार आहे, हे विशेष.

येथील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास केंद्राच्या सेवामार्गात बाल संस्काराला नेहमीच प्राधान्य दिले जाते. कारण संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्मं टिकला तर राष्ट्र टिकेल. म्हणजेच संस्कार हा स्वतः पुरता महत्वाचा नसून राष्ट्राची जडणघडण संस्कारावरच अवलंबून आहे.

घराघरात संस्कृती टिकली तरच धर्म टिकणार आहे. मानव हा जन्मतःच ज्ञानी वा सुसंस्कारी नसतो. माता-पिता-गुरुंकडून जे संस्कार बाल मनावर घडतात त्यानुसार पिढी घडत असते.

बालवय हे संस्कारक्षम व अनुकरणीय असते. म्हणुन बालपणातच संस्कार अधिक चांगल्या प्रकारे करता येतात. बाल संस्काराचे हे अनन्यसाधारण महत्व ओळखूनच प्रत्येक श्री स्वामी समर्थ विकास केंद्रास जोडून बालसंस्कार केंद्र कार्यरत आहेत. येथील स्वामी समर्थ केंद्रातर्फे शंभरावर बालसंस्कार केंद्र चालवले जातात.

दरम्यान, संपुर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाचवेळी दि. 12 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत नंदुरबार तालुक्यातील चौपाळे येथील प्रकल्प, शहादा, धडगाव, खापर, शनिमांडळ, भालेर, कलमाडी, जोगशेलू व साक्री याठिकाणी एक दिवसीय हिवाळी बालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

या शिबीरात सकाळी 8 वाजता सर्व शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत भुपाळी होईल. 8.15 ते 9 वाजेदरम्यान नाश्ता, चहा, सकाळी 9.30 ते 10.30 नित्यसेवा, 10.45 ला आरती, सकाळी 10.45 ते 11.30 सामुदायिक मार्गदर्शन (जिल्हास्तरीय प्रबोधनात्मक मार्गदर्शन) 11.30 ते 12.30 गटनिहाय मार्गदर्शन (वयोगट 5 ते 12, 12 ते 18), 12.30 ते 1.30 दरम्यान दुपारचे जेवण, दुपारी 2 ते 4 वाजता विविध विभाग प्रशिक्षण स्टॉल सादरीकरण व प्रशिक्षण असा कार्यक्रम होणार आहे.

यावेळी पर्यावरणपूरक उपक्रम, अभ्यासाची पद्धती (अध्यात्मीक सेवा तंत्र तोडगे), वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा, करीअर गाईडन्स, पाठयक्रम कसे घ्यावे, पालकांसाठी मार्गदर्शन (मुलांसोबत कसे वागावे), वैद्यकीय सेवा, आयुर्वेद विभाग, कृषि, वास्तुशास्त्र, स्वयंरोजगार, विवाहसंस्कार देशविदेश, मुद्रण, बालसंस्कार, स्तोत्र, मंत्र, संथा व विज्ञान (यांत्रिकी) आदींबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. दुपारी 4 ते 4.30 वाजता जिल्हास्तरीय प्रबोधनात्मक मार्गदर्शन व सांगता करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

*