काँग्रेसने केले शासनाचे वर्षश्राद्ध

0

नंदुरबार । दि.08 । प्रतिनिधी-नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याने नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने शासनाचे वर्षश्राद्ध घालून काळा दिवस पाळला. यावेळी तहसिल कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

यावेळी नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे तहसिलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, नोटाबंदी हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा असून त्याचे दुष्परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागत आहेत.

या निर्णयानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीत पैसे काढण्यासाठी बँकेच्या बाहेर रांगेत उभे असतांना देशभरातून दिडशे लोकांचा मृत्यू झाला. दहशतवादही संपलेला नाही. काश्मिर खोर्‍यात आपल्या सैनिकांवर दगडफेक सुरू आहेत.

आजपर्यंत काळा पैसा परदेशातून आपल्या देशात आला नाही. प्रत्येकाच्या बँकखात्यात 15 लाख रूपये येणार होते, त्याचे काय झाले ते सरकार सांगायला तयार नाही.

एवढे काही झालेले असतांनाही सरकार मात्र भारतीय अर्थव्यवस्थेवर केलेल्या या सर्जिकल स्ट्राईकला फार मोठी उपलब्धी असल्याचे भासवत आहे.

काळ्या पैशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नोटाबंदी केली होती, असे सांगण्यात आले असले तरी वास्तवात केवळ सोळा लाख कोटी रूपयेच बँकांकडे जमा न होता फक्त 15.28 लाख कोटी रुपयेच बँकांकडे परत आलेले आहेत.

या घटनेला आज 8 नोव्हेंबर 2017 रोजी एक वर्ष पूर्ण झाल्याने त्याचा नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काळा दिवस पाळून जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी तहसिल कार्यालयासमोर केंद्र व राज्य शासनाचे वर्षश्राद्ध करण्यात आले. काही कार्यकर्त्यांनी मुंडन करुन श्राद्धाचा विधी तहसिल कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर केला. यावेळी मयताची वाजंत्रीही वाजविण्यात येवून शासनाविरोधी घोषणा करण्यात आल्या.

यावेळी आ.चंद्रकांत रघुवंशी, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, पं.स.सभापती श्रीमती रंजनाताई नाईक, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के.पाटील, कृऊबा समिती सभापती भरत पटेल, माजी जि.प.अध्यक्ष रमेश गावीत, रसिकलाल पेंढारकर, कुणाल वसावे आदी उपस्थित होते. निवेदनावर आ.चंद्रकांत रघुवंशी, काँग्रेस तालुकाध्यक्ष सुभाष राजपूत, जि.प. बांधकाम सभापती दत्तु चौरे, शेतकी सह संघ अध्यक्ष बी.के. पाटील, जि.प. सदस्य विक्रमसिंग वळवी, माजी कृउबास सयाजीराव मोरे, कृउबास भरत पटेल, किशोर पाटील, दिनेश पाटील, जगन्नाथ पाटील, शहर काँग्रेस अध्यक्ष रविंद्र मराठे, नगरसेवक कुणाल वसावे, रसिकलाल पेंढारकर, विलास रघुवंशी, रोहिदास राठोड, राजेंद्र माळी, रविशंकर शर्मा जितेंद्र ठाकरे, अंकुश पाटील, भरत राजपू,त पुनमचंद पाटील, बापू पाटील यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

 

तळोदा येथे प्रशासकीय कार्यालयासमोर धरणे

नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतीय अर्थव्यवस्थेचा काळा दिन व फसव्या नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यानी काळ्या फिती लावून निषेध व्यक्त केला तसेच प्रशासकीय इमारतीसमोर धरणे आंदोलन केले.

भाजपा सरकारने सामान्य जनतेला वेठीस धरुन 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी लादून भयंकर दुष्परिणाम देशाला दिले, या निषेधार्थ अर्थव्यवस्थेचा काळा दिन व फसव्या नोटबंदीच्या विरोधात काँग्रेस पक्षातर्फे काळ्या फिती लावून या निर्णयाचा निषेध करण्यात आला.

या विरोधात तळोदा प्रधासकीय इमारतीबाहेर माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, पालिकेचे गटनेते भरत माळी, जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी जि.प.उपाध्यक्ष़ सुहास नाईक, केसंजय माळी, माजी नगरसेवक सुभाष चौधरी, गौरव वाणी, तालुका अध्यक्ष रोहीदास पाडवी, माजी सभापती धनसिंग वळवी, माजी पं.स.सभापती आकाश वळवी, माजी पं.स उपसभापती नंदुगीर गोसावी, माजी समाजकल्याण सभापती नरहर ठाकरे, जि.प.सदस्य वेस्ता पावरा, सुरेश इंद्रजित, माजी सभापती सतीश वळवी, अरविंद पाडवी, मंगेश पाटील, अनिल माळी, दीपक मोरे, गोविंदा पाडवी, गौतम जैन, प्रकाश ठाकरे आदी उपस्थित होते. धरणे आंदोलनानंतर तहसीलदार योगेश चंद्रे यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे चलनातल्या 86 टक्के नोटा बाहेर गेल्या. काँग्रेस व इतर पक्षांनी या निर्णयाचा जोरदार विरोध केला होता. काळा पैसा संपवण्यासाठी, बनावट नोटांना आळा घालणे, दहशतवाद्यांना होणारा पतपुरवठा रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेतला असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली. या अविचारी निर्णयामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम झाला.

या निर्णयामुळे देशातल्या गरीब वर्गाला मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे. एटीएमच्या बाहेर रांगेत उभे असलेले 300 पेक्षा जास्त लोकाना यामुळे प्राण गमवावा लागला आहे. लाखो लोकांच्या रोजगार गमवावा लागला आहे. हजारो मध्यम व लघु उघोग बंद झाले. लघु उद्योजक, शेतकरी, व्यापारी, कामगारांना मोठा फटका सहन करावा लागला आहे. एका वर्षात नोटाबंदीचा एकही उद्देश सफल झाला नसून जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. या निर्णयामुळे अर्थव्यवस्थेवर प्रचंड नुकसान झाले आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

यावेळी महिला प्रतिनिधी शानुताई वळवी, लताबाई अर्जुन वळवी, ताईबाई, बेबीबाई, उमाबाई पाडवी, निर्मलाबाई पाडवी, गणेश सोशल ग्रुपचे संदीप परदेशी, हितेंद्र खाटीक, मंगेश पाटील, अरविंद पाडवी, दिवाकर पवार, दीपक मोरे, गोविंदा पाडवी, उद्धव पिंपळे, आदी सह मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*