जिल्ह्यास्तरीय बुध्दीबळ निवड चाचणी स्पर्धा

0
नंदुरबार / भारतीय बुद्धिबळ संघटनेतर्फे पंजाब येथे होनार्‍या 13 वर्षाआतील व अदमान-निकोबार येथे होनार्‍या 25 वर्षाआतील राष्ट्रीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ अखिल मराठी राज्य बुद्धिबळ संघटनेतर्फे दि.24 ते 31 मे दरम्यान सांगली आणि पुणे येथे राज्यस्तरीय मानांकन अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेद्वारे निवडला जाणार आहे.
सदर राज्यस्तरीय निवड चाचणी स्पर्धेत नंदुरबार जिल्ह्याचा संघ सहभागी होणार आहे. यासाठी अखिल मराठी राज्य बुध्दीबळ संघटनेच्या मान्यतेने व अश्वमेघराज चेस क्लबच्या आयोजनाने 13 वर्षा आतील व 25 वर्षा आतील मुला-मुलींच्या जिल्ह्यास्तरीय बुध्दीबळ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

निवड चाचणी स्पर्धेत सहभागासाठी 13 वर्ष वयोगटात 1 जानेवारी 2004 नंतर आणि 25 वर्ष वयोगटासाठी 1 जानेवारी 1992 नंतर जन्मलेले खेळाडू पात्र ठरतील.

स्पर्धेतील एकूण आठ खेळाडूंची निवड सांगली आणि पुणे येथे सर्व विजेत्या खेळाडूंना सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

 

LEAVE A REPLY

*