शहादा येथे 54 लाखाच्या रस्त्याचा शुभारंभ

0

शहादा। ता.प्र.-शहरातील बस स्थानकासमोर ते दर्ग्यापर्यंतच्या 54 लाख रुपये किमतीच्या मुख्य रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. या रस्त्यामुळे असल्याने रहदारीची समस्या सुटणार आहे.

येथील नगर परिषदेत गेल्यावर्षी झालेल्या निवडणुकीत भाजपाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष मोतीलाल पाटील विजयी झाले. पालिकेत सत्ता स्थापनेनंतर नगराध्यक्ष पाटील यांच्या नेतृत्वाखाली विकास कामांना सुरूवात झाली.

शहरातील मुख्य मेन रोड काँक्रीटीकरण झाल्याने रस्ता मोकळा श्वास घेत आहे. शहरात सार्वजनिक शौचालय बांधकाम प्रगतीपथावर आहे.

तसेच बसस्थानकालगत ते दग्यापर्यंत व महात्मा ज्योती फुले चौक ते जवाहर स्टोअर्सपर्यंत दोघा भागातील दोंडाईचा रोडवर खड्डे धुळीचा त्रास होत होता.

नगराध्यक्ष पाटील व पालिकेतील नगरसेवकांनी दोंडाईचा रस्त्यावरील कामांना प्रथम पसंती दिली. या रस्त्याचे कामांचे भुमिपूजन गेल्या महिन्यात आमदारद्वयींच्या उपस्थितीत झाले.

54 लाख रूपयाच्या खर्चाच्या या रस्त्याचे कामास प्रारंभ झाला आहे. या रस्त्यावरील अनधिकृत अतिक्रमण हटविण्यात आले आहे.

रस्त्याच्या कामामुळे खड्डे धुळीचा त्रास कमी होणार आहे. सोबत अतिक्रमण हटविल्याने रस्ता मोकळा झाला आहे. बसस्थानकास लागून जागेवर दुचाकी वाहन तळ, ‘पे अ‍ॅन्ड पार्क’ तत्वावर करण्याचे नगराध्यक्ष मोतीलाल पाटील सांगितले.

LEAVE A REPLY

*