14 बंधार्‍यातील गाळ काढण्यास सुरुवात

0

नंदुरबार । प्रतिनिधी-येथील पी.के.अण्णा फाऊंडेशनतर्फे या वर्षीही लोकसहभागातून नाल्यातील गाळ काढण्यासाठी पुढाकार घेण्यात आला असून नंदुरबार तालुक्यातील सुंदर्दे ते लोणखेडा दरम्यान असलेल्या नाल्यावरील 14 बंधार्‍यातील गाळ काढण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ जिल्हाधिकार डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या हस्ते सोमवारी झाला.

जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी गेल्या दोन वर्षांपासून जिल्ह्यात जलसंधारणाच्या कामात लोकसहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांनी विविध संस्था व नागरीकांना प्रोत्साहीत केले आहे. त्यातूनच पी.के.अण्णा फाऊंडेशनचे पदाधिकारी शितल पटेल व सहकार्‍यांनी नंदुरबार तालुक्यातील विविध गावांचे सर्वेक्षण केले.

त्यात सुदंर्दे ते लोणखेडा या गावांच्या दरम्यान असलेला उंडवा नाला हा पूर्णपणे गाळाने भरलेला दिसून आला. तसेच या परिसरातील शेतकर्‍यांनीही गेल्या काही वर्षांपासून या नाल्यात पाणी नसल्याने शेतीसाठी पाणी मिळत नसल्याची प्रतिक्रीया बोलून दाखविली.

त्यानुसार त्यांनी कृषी विभाग व कृषी विज्ञान केंद्रांच्या अधिकार्‍यांशी संपर्क साधून तांत्रिक माहिती मिळविली. एकूण 14 किलो मीटरचा हा नाला असून त्यावर 14 सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यातील 12 बंधारे सुस्थितीत असून दोन बंधारे दुरूस्त झाले आहेत.

या संदर्भातील माहिती त्यांनी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांना दिली. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी परिसरात पाहणी करून शेतकर्‍यांच्या भेटीही घेतल्या. त्यांचा उत्साह वाढविला.

त्यानुसार या कामाला सोमवारी शुभारंभ करण्यात आला. यावेळी लाभ क्षेत्र असलेल्या 8 गावातील नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.

यासाठी पी.के.अण्णा फाऊंउेशन अनेक दात्यांनी देणगीही यावेळी जाहीर केली. लग्न समारंभातून या फाऊंडेशनला या कार्यासाठी देणगी मिळाली आहे.

LEAVE A REPLY

*