वेळावद येथे उन्नत शेती समृद्ध शेतकरी मोहिमेंतर्गत सभा

0
नंदुरबार / तालुक्यातील वेळावद येथे उन्नत शेती समृध्द शेतकरी मोहिमेअंतर्गत शेतकरी सभा घेण्यात आली. यावेळी शेती औजार अनुदान व कार्यपध्दतीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी सभेचे आयोजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी वेळावदचे सरपंच मोहन वळवी होते.
याप्रसंगी धानोरा मंडळ कृषी अधिकारी बी.एम. पवार, वि.का.सोसायटीचे चेअरमन अर्जुन वळवी, उपसरपंच योगेश पाटील आदी उपस्थित होते.

कृषी सहाय्यक करणसिंग गिरासे यांनी कृषी यांत्रिकीकरण घटकांपर्यंत लहान ट्रॅक्टर 8 ते 20 एचपी, मोठे ट्रॅक्टर 21 ते 70 एचपी खरेदीसाठी कृषी यंत्र व औजारे अंतर्गत पावर टिलर, रोटाव्हेटर, कल्टीव्हेटर सर्व प्रकारचे प्लांटर, मळणी यंत्र, भात लावणी यंत्र, पावरा विडर, थ्रेशर, मिनी भात मिली, दाल मिल, कापूस पर्‍हाटी, श्रेडर, मल्चर ट्रॅक्टर चलीत फवारणी यंत्र हे यंत्र खरेदीसाठी अनुदानाचे दर व कार्यपध्दती आणि लाभ शेतकर्‍यांनी घ्यावा.

औजारे व ट्रॅक्टर निवडीचे संपूर्ण स्वातंत्र्य शेतकर्‍यांना आहे. तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवड, गांडुळखत उत्पादन टाकी नॅडेप खत टाकी उभारणी व कापूस लागवड तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

*