भाजप उमेदवारांची नावे जाहीर

0

मोदलपाडा । वार्ताहर – नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा पालिकेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाने नगरसेवक पदासाठी पहिल्या यादीतील उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे.

तळोदा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपाचे तळोदा नगरपालिका निवडणूकीचे प्रभारी आमदार उदेसिंग पाडवी यांनी ही उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. दरम्यान, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील, असेही यावेळी सांगण्यात आले.

तळोदा पालिका निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. मात्र, अद्याप निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता जाहीर केलेली नाही.

आचारसंहिता जाहीर होण्याच्या अगोदरच तळोदा भाजपाने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करून पालिका निवडणुकीत आघाडी घेतली आहे.

तळोदा पालिका निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवारांच्या पहिल्या यादीत प्रभाग क्र.1 अ मध्ये, रामानंद शिरीषकुमार ठाकरे, ब मध्ये भाग्यश्री योगेश चौधरी, प्रभाग क्र.2 अ साठी प्रा.विलास कल्याण डामरे किंवा डॉ स्वप्नील वसंतराव बैसाणे, प्रभाग क्रमांक 3 अ साठी बेबीबाई हिरालाल पाडवी, प्रभाग क्रमांक 4 अ मध्ये शोभाबाई जालंधर भोई, प्रभाक क्र.4 ब मध्ये शेख अमाददोन शेख फकरूद्दीन, प्रभाग क्रमांक 5 अ मध्ये अंबिका राहुल शेंडे, क्रमांक 5 ब मध्ये सुरेश महादू पाडवी, प्रभाग क्रमांक 6 अ मध्ये सविता नितीन पाडवी, प्रभाग क्रमांक 7 अ मध्ये योगेश प्रल्हाद पाडवी, प्रभाग क्र.7 ब मध्ये सूनयना अनुपकुमार उदासी, प्रभाग क्रमांक 9 अ मध्ये रंजनाबाई अविनाश प्रधान, प्रभाग क्र.9 ब मध्ये अंबालाल लोटन चव्हाण किंवा दीपक जीवन चौधरी यांना उमेदवारी मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
प्रभाग क्र.2 अ मधून प्रा विलास डामरे किंवा डॉ.स्वप्नील बैसाने यांना उमेदवारी दिली जाणार आहे. प्रभाग क्र 9 ब साठीदेखील दोन उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. त्यात अंबालाल चव्हाण किंवा दीपक चौधरी यांच्यापैकी एकाला संधी मिळेल.र उर्वरित प्रभाग क्र.2 ब, प्रभाग क्र.3 ब व प्रभाग क्र 6 ब या जागांवरील उमेदवार हे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर जाहीर झाल्यानंतर निश्चित होतील.

या जागांवर नगराध्यक्ष पदाची उमेदवारी न मिळणार्‍या उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींना तिकीट देणार असल्याची माहिती आमदार उदेसिंग पाडवी यांनी पत्रकार परिषदेत सांगितली.

निवडणूक कार्यक्रम व आचारसंहिता जाहीर होण्यास होणार उशीर लक्षात घेता भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करणार्‍यांना आपापल्या प्रभागात प्रचाराला व जनसंपर्काला पुरेसा वेळ मिळावा म्हणून आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच भाजपाकडून पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्याचे आमदार पाडवी यांनी सांगितले.

नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसंबधी ते म्हणाले की, नगराध्यक्ष पदासाठी तीन जणांनी उमेदवारी मागितली आहे, परंतु तीनही दिग्गज व तुल्यबळ उमेदवार असल्याने नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीचा निर्णय मुख्यमंत्री घेतील.

त्या निर्णय प्रक्रियेत मी ही सहभागी असेन पण अंतिम निर्णय तेच घेतील, असे सांगितले. पहिल्या यादीत राहिलेल्या काही प्रभागातील इच्छूक उमेदवार मुलाखतीच्या वेळी वैयक्तिक कामानिमित्ताने बाहेरगावी गेल्याने त्यांच्या उमेदवारीबद्दलचा निर्णय घेण्यात आला नसून लवकरच राहिलेल्या जागांवरचे उमेदवार देखील जाहीर केले जातील,असे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर नव्याने पक्षात आलेल्याला सोबत सर्व समाज घटकांना उमेदवारी देतांना सबका साथ-सबका विकास हे सूत्र अवलंबिल्याचे देखील ते म्हणाले.

या पत्रकार परिषदेला भाजपाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी, तळोदा तालुका भाजपा अध्यक्ष राजेंद्रसिंग राजपूत, तळोदा शहराध्यक्ष हेमलाल मगरे, डॉ.स्वप्नील बैसाने, शिरीष माळी, डॉ.रामराव आघाडे, कार्यालयीन प्रमुख कौशल सवाई, संजय कलाल, भास्कर मराठे, गोकुळ मिस्तरी, दीपक चौधरी, जगदीश परदेशी, आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेपूर्वी आ.उदेसिंग पाडवी यांनी शहरातील मेन रोड परिसरात भाजपा निवडणूक संपर्क कार्यालयाचे उदघाटन केले.

 

LEAVE A REPLY

*