तीन दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास महामार्गावर रास्ता रोको : नवापूर विकास आघाडीतफे बेडकी चेकपोस्टवर अर्धनग्न भिकमांगो आंदोलन

0
नवापूर |  प्रतिनिधी : राष्ट्रीय महामार्ग क्र.६ कोंडाईबारी ते नवापूर आर.टी.ओ.चेकपोस्ट बेडकी रस्ता दुरुस्तीसाठी अर्धनग्न भिकमांगो आंदोलन करण्यात आले. दरम्यान, तीन दिवसात रस्ता दुरुस्त न झाल्यास महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा नवापूर विकास आघाडीतर्फे देण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ. मल्लीनाथ कल्लशेट्टी यांना नवापुर विकास आघाडीचे सचिव मंगेश गंगाधर येवले यांनी दिले होते. मात्र याबाबत काहीच दखल न घेतल्याने सकाळी नवापूर विकास आघाडीचा पदाधिकारी यांनी शहरात व महामार्गावर अर्धनग्न भीक मांगुन आंदोलन केल्याने नगर पालिका निवडणुकीच्या वातावरणात विकास आघाडीचे हे अनोखे आंदोलन चर्चेचा विषय ठरला आहे.

याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले रा.म.क्र ६ जळगाव ते गुजरात राज्य सीमा बेडकीपाडा पर्यंतचा रस्ता दुरुस्तीसाठी २०१५ मध्ये १५ कोटी रुपये खर्चून प्रशासनाने दुरुस्त करतांना ठेकेदारांचा भ्रष्ट व मनमानी कारभारामुळे या रस्त्याची अक्षरशः चाळणी झालेली असून सदर ठिकाणी २०१६ मध्ये या खड्डयांमुळे अपघात होवून दोन युवकांचा मृत्यु झाला आहे.

या रस्त्याच्या निकृष्ठ व भ्रष्ट कारभाराबाबत नवापूर विकास आघाडीतर्फे अनेकवेळा मौखिक व लेखी स्वरुपात तक्रारी देऊनही ह्या भ्रष्ट प्रशासन आणि ठेकेदारांच्या संगनमताने ह्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. प्रशासनाने बघ्याची भुमिका घेतली आहे.मागील आठवडयात सदर रस्त्यावर ३ जीवघेणे अपघात झालेले असून त्यापैकी एकाने स्वत:चा पाय गमावला आहे.

अशा प्रशासनाचा निषेध म्हणुन २ नोव्हेंबर २०१७ रोजी शहरातुन रा.म.मार्गावर अर्धनग्न होऊन भिक मांगो आंदोलन करण्यात आले. आंदोलनाची सुरुवात सकाळी ११वाजता महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली.

संदिप पारेख व मंगेश येवले यांनी पुष्पहार अर्पण आंदोलनाला सुरुवात केली. शहातील दुकानदार, व्यापारी, प्रवासी तसेच गावात नागरीकांकडुन भिक मागितली. नंतर महामार्गावर जाऊन ट्रक चालक व इतर वाहने यांच्याकडून भीक मागितली.

यावेळी विकास आघाडीचे संदिप पारेख, मंगेश येवले, राकेश सोनार, जितेंद्र अहिरे, ऱाहुल मराठे, रामु गिरासे,पिन्टु भावसार, संदिप हिरे, प्रदिप हिरे, सह कार्यकर्त्यानी अर्घनग्न होऊन भिक मागुन सरकारचा धिक्कार केला. लाईट बाजार, बसस्थानक परीसर, कृषी उत्पन बाजार आवार, शॉपींग सेंटर यानंतर महामार्ग क्रमांक ६ या रस्त्यावर जाऊन भिक मागीतली. या आंदोलान एकुण ३१७५ रुपये जमा झाले, ते डीडीद्वारे तहसीलदार प्रमोद वसावे यांना देण्यात आले.

वसावे यांनी दुरध्वनीवरुन महामार्ग अधिकारी यांच्याशी संपर्क साधला त्यांनी दुरुस्तीचे आश्वासन दिले. ३ दिवसाचा दुरुस्ती झाली नाही तर हायवे वर रस्ता रोको करु असा इशारा विकास आघाडीने दिला आहे.

LEAVE A REPLY

*