आंबेबारी धरणाचे पाणी नंदुरबारसाठी आरक्षित : विद्यमान पालिका सदस्यांच्या शेवटच्या विशेष सभेत विविध कामांना मंजूरी

0
नंदुरबार |  प्रतिनिधी :  येत्या वर्षाच्या उन्हाळयासाठी पाणीटंचाई भासू यासाठी आंबेबारी धरणातील ४० दशलक्ष धनफुट पाणी शहरासाठी आरक्षीत करण्याच्या निर्णय पालिकेच्या शेवटच्या विशेष सभेत घेण्यात आला. येथील पालिकेच्या विद्यमान नगरसेवकांच्या कार्यकाळातील शेवटची विशेष सभा आज नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी विविध विकास कामांना मंजूरी देण्यात आली.

या सभेत साईविला, गिरीकुंज सोसायटी, नविन आनंद पार्क व इतर ठिकाणी वाढीव प्रॉपटी्र कनेक्शनसह भुयारी गटार टाकणे व इतर ४५ कामे करण्यासाठी विहित प्रकियेचा अवलंब करून निविदा दर मागवून न्युनतम दराची निविदा अध्यक्षांनी मंजूर दिली होती. त्यास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

शहरासाठी सन २०१८ च्या उन्हाळयामध्ये पाणीटंचाई भासू नये याकरीता आंबेबारा धरणातील ४० द.ल.घ.फु. पाणी आरक्षित करुन त्याकामी येणार्‍या खर्चास मान्यता देण्यात आली. रामचंद्रनगर मधील सहा मीटर रूंदीच्या रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे व इतर ७ कामांचे खर्चाचे अंदाजपत्रक अध्यक्षांनी परिषदेच्या ठरावास पात्र राहून मंजूरी प्रदान केली. त्यास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

सिससनं ४५१, अ,१अ, १,अ, २ पैकीच्या जागेतील नुतन कन्या विद्यालयासमोरील संगम टेकडी जागेतील सीएल३ परवाना स्थलांतरीत करण्याकामी नपाचा हरकत दाखला अध्यक्षांनी परिषदेच्या ठरावास पात्र राहून देण्याचे आदेश दिले. त्यास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

शहरातील विविध ठिकाणी पथदिवे चालू बंद करण्यासाठी टायमर स्विच खरेदी करण्यासाठी आलेल्या ई निविदेला कार्योत्तर मंजूरी देण्यात आली. नगरपालिका क्षेत्रातील १६ मी व २० उंचीचे हायमस्ट विद्युत खांब्यांवर २०० व्हॅटचे एलईटी फिटींग लावण्याकामी न्युनतम दराची निविदा मंजूर केली. त्यास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

नंदुरबार शहरात विविध ठिकाणी १०० विद्युत पोल उभारणी करण्याकामी मुदतीत प्राप्त झालेल्या निविदांपैकी न्युनतम निविदा धारकाला अध्यक्षांनी मंजूरी दिली, त्यास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली. पालिका मालकीच्या इमारतीवर व पथदिव्यांसाठी लागणारे विद्युत साहित्य खरेदी करण्यासाठी मुदतीत प्राप्त झालेल्या निविदांवर निर्णय घेण्यात आला, त्यास कार्योत्तर मंजूरी देण्यात आली.

योगेश्‍वर कॉलनीमधील रस्ते खडीकरण व डांबरीकरण करणे व इतर २९ कामे करणे कामांचे रक्तदार जय साई कस्ट्रक्शन पुणे यांनी मुदतवाढ मिळण्याकामी सादर केलेल्या अर्जावर निर्णय घेण्याबाबत विचार करण्यात आला. या यावेळी पालिकेचे मुख्याधिकारी राहूल वाघ, तसेच सर्व नगरसेवक, न.प.कर्मचारी अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*