प्रकाशातील कार्तिक स्वामीं मंदिरात हजारो भाविकांची मांदियाळी

0
प्रकाशा, ता.शहादा |  वार्ताहर  :  येथील कार्तिक स्वामी महाराजांचे मंदिर आज कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी उघडण्यात आले. परंतू भाविकांचा ओघ लक्षात घेता हे मंदिर  दि. ४ रोजीदेखील दिवसभर उघडे ठेवण्याचा निर्णय मंदिर विश्‍वस्त समितीने घेतला आहे.

वर्षातून कार्तिक स्वामींचे मंदिराचे द्वार एकच दिवस उघडत असल्याने कार्तिक स्वामी मंदिर आता भाविकांसाठी आस्थेचे स्थान निर्माण झाले आहे. कार्तिक स्वामींचे मंदिराचे द्वार मंदिर समिती कार्यध्यक्ष रमेश ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत दुपारी कार्तिक पौर्णिमेचे मुहूर्त साधून १ वाजून ४६ मिनिटांनी दर्शनासाठी द्वार उघडण्यात आले.

याप्रसंगी सकाळपासून मंदिराचा प्रागणात लांबलचक रांगा लागल्या होत्या. महिला भाविकांची अधिक संख्या होती. याप्रसंगी कार्तिक स्वामी, गणपती, महादेव, पार्वती यांची पूजा आरती करण्यात आली. मोरपीसचे नैवैद्य दाखवून पूजाअर्चा केली. रात्री उशिरा पर्यंत भाविकांचा ओघ वाढला होता.

रात्री भजनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. मंदिराच्या प्रांगणात भाविकांच्या सुविधेकरिता मंडप उभारण्यात आला. धार्मिक पूजा साहित्य विक्रीकरीता दुकाने थाटली होती. मोर पिसांचा बाजार भरवण्यात आला. मंदीर समितीद्वारे खडीसाखर शेंगदाण्याचा प्रसाद स्वरूपात वाटप केले जात आहे.

ग्रामप्रशासनाचा विकास आराखडा अंतर्गत मंदिर व परिसराच्या सुधारणेसाठी तरतूद असल्याने भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे. परिणामी दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढल्याने आज रोजी दिवसभर मंदिर खुले राहणार आहे. मंदिराचे पुजारी विनोद ढाकणे हे नवग्रह पूजा होमहवन पूजा पाठ आरती आदी कार्यासाठी योगदान देणार आहेत. रमेश माळी सपत्नीक विधी पार पाडणार आहेत.

LEAVE A REPLY

*