जिल्हयात 45 हजार शेतीपंपाची 348 कोटीची थकबाकी

0

नंदुरबार । दि.3 । प्रतिनिधी-जिल्ह्यातील 45 हजार 801 शेतीपंप ग्राहकांकडे 31 मार्च 2017 अखेर 348 कोटीची थकबाकी आहे. त्यात 193 कोटी मुळ थकबाकी व 155 कोटी व्याज व दंडाच्या रकमेचा समावेश आहे.

दरम्यान, 6 हजार 777 शेतीपंप ग्राहकांनी वीज जोडणी घेतल्यापासून एकदाही वीजबिल भरले नाही. या ग्राहकांकडे 41 कोटी रूपये थकबाकी आहे.

जिल्ह्यातील थकबाकीदार शेतीपंप ग्राहकांनी चालू वीजबिल येत्या 15 नोंव्हेंबरपर्यंत भरुन मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी व्हावे व योजना निकषानुसार मुळ थकबाकी पाच ते दहा समान हप्त्यात भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी केले आहे.

शहादा विभागाची थकबाकी सर्वाधिक
नंदुरबार जिल्ह्यातील 45 हजार 801 शेतीपंप ग्राहकांकडे 31 मार्च 2017 अखेर 348 कोटीची थकबाकी आहे. त्यात 193 कोटी मुळ थकबाकी व 155 कोटी व्याज व दंडाची रक्कम आहे. जिल्ह्यात शहादा विभागातील 22 हजार 611 ग्राहकांकडे सर्वाधिक 257 कोटीची थकबाकी असून त्यात 137 कोटी मुळ थकबाकी तर 120 कोटी व्याज व दंडाची रक्कम आहे. नंदुरबार विभागात 23 हजार 190 ग्राहकांकडे 91 कोटी (मुळ थकबाकी 57 कोटी व व्याज व दंड 34 कोटी) आहे. शहादा उपविभागांची थकबाकी सर्वाधिक 207 कोटी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा विभागातील शहादा उपविभागांकडे 15 हजार 234 शेतीपंप ग्राहकांकडे सर्वाधिक 207 कोटीची थकबाकी आहे. त्यात मुळ थकबाकी 106 कोटी तर व्याज व दंड 101 कोटी आहे. तळोदा उपविभागात 5 हजार 249 ग्राहकांकडे 41 कोटी

 

LEAVE A REPLY

*