कार्तिक स्वामींचे मंदिर आज उघडणार

0

पूनम चव्हाण,प्रकाशा ता. शहादा ।-वर्षातून एकदाच उघडणारे येथील कार्तिक स्वामी मंदिराचे द्वार उद्या दि. 3 नोव्हेंबर रोजी दुपारी 1.46 वाजता उघडण्यात येणार असन दि.4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.52 वाजता र्पौर्णिमेच्या विधीवत वेळेत बंद करण्यात येणार आहे.

दक्षिण काशी म्हणून प्रसिध्द असलेले प्रकाशा येथील कार्तिक स्वामीचे मंदिरात बरीच सुधारणा करण्यात आली आहे. प्राचीन काळातील मंदिर असल्याने मंदिरातील विविध भागातील डागडुजी सुव्यवस्था, सुधारणा तसेच रंगरंगोटी करण्यात आल्याने मंदिराचा संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला आहे.

येथील कार्तिक स्वामी यात्रोत्सवाचे औचित्य साधून गठन केलेल्या समितीमार्फत मंदिराचा आत बाहेर परिसरात चांगल्या प्रकारच्या सुविधा करून दिल्याने ग्रामस्थ व भाविकांनी समाधान व्यक्त केले आहे.

प्रकाशातील विविध महाकाय मंदिरापैकी कार्तिक स्वामींचे पुरातन पाषाणाचे मंदिर आहे. बुधवार बाजारपेठ परिसरात तापी नदीच्या निसर्गसौंदर्यात वसलेले हे पुर्वमुखी मंदिर आहे.

मंदिराच्या गाभार्‍यात शिवपार्वतीची मुर्ती आहे. त्याच्या मागे भिंतीला लागून गणपती व कार्तिक स्वामी अशा पाषाणयुगातील मुर्त्यांची स्थापना पुर्वजांनी केली आहे.

महादेव पार्वतीला दोन मुले होती, गणेश व कार्तिक स्वामी. दोघा पुत्रांपैकी जो कोणी पृथ्वीला प्रदक्षिणा घालेल त्याचा विवाह आधी करण्याचे मातापित्यांनी सांगितले.

त्यावेळी शंकर पार्वती यांना अलिंगण देवून कार्तिक स्वामी पृथ्वीच्या भ्रमंतीला निघाले. कार्तिक स्वामींना पृथ्वीला पूर्ण प्रदिक्षणा घालण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागला.

त्यामुळे एका वर्षानंतर हे मंदिर दर्शनासाठी उघडत असते. या पौराणिक कथेच्या आधारावर विश्वस्त कार्तिक स्वामीजी दर्शनासाठी भाविकांसाठी वर्षातून एकदाच मंदिराचेद्वार उघडत असतात.

कार्तिक स्वामींनी पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्यासाठी मोराचा वापर केला होता. म्हणून भाविक दर्शनासाठी मोरपिस, प्रसाद, नारळ इतर धार्मिक साहित्य घेवून मंदिरात जावून गणेश महादेव, पार्वती, कार्तिक स्वामी या पुरातन देवालयात जावून पुजाअर्चा करीत असतात.

एका मोरपिसाचे नैवैद्य म्हणून समोर ठेवतात व दुसरे मोरपिस धार्तिक प्रतिक, शुभ प्रतिक म्हणून भाविक स्वेच्छेने घरी घेवून जातात. या यात्रेला दिवसेंदिवस चालना मिळत असून येथील मंदिरातील भक्तांच्या सेवेकर्‍यांचे मोठे योगदान राहिले आहे.

कार्याध्यक्ष रमेश माळीच यांचे कार्यसिध्दीला योगदान आहे. दुपारी 1. 46 मिनीटांनी मंदिराचे द्वार उघडण्यात येणार आहे. यावेळी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्ताने यात्रौत्सव सुरू होणार आहे.

दि.4 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.52 वाजता र्पौर्णिमेची विधीवत वेळ समाप्त होणार आहे. हिंदू धार्मिक पंचागनुसार कार्तिक पौर्णिमाचा दिवस वेळ काळ असतो.

त्या पार्श्वभुमीनुसार दरवर्षी कार्तिक स्वामींचे मंदिराचे द्वार उघडले जात असते. या दरम्यान भाविकांचा दर्शनासाठी रांगा लागतात.

वर्षातून एकदाच कार्तिक स्वामींचे मंदिाचे द्वार उघडत असल्याने त्यानिमित्ताने वर्षातून सातत्याने समितीद्वारे पुजाअर्चा होम हवन केले जाते.

यावर्षी पुजेचा मानकरी रमेश रोहिदास माळीच, त्यांच्या पत्नी द्वारकाबाई रमेश माळीच यांच्या हस्ते हवन पुजा, नवग्रहपुज्य पुजा आरती, महाप्रसाद वाटप आदी कार्यक्रम होणार आहे. उद्या दि. 3 नोव्हेंबर रोजी कार्तिकस्वामी दर्शन व यात्रौत्सवास प्रारंभ होणार आहे. समाप्ती दि.4 नोव्हेंबर रोजी होणार असून सकाळी 11 वाजेपर्यंत दर्शन मिळणार आहे.

नंतर पौराणिक कथेनुसार वर्षभर मंदिराचेद्वार बंद करण्यात येईल. या यात्रोत्सवानिमित्त मंदिरावर रोषणाई करण्यात आली आहे.

यावेळी कार्तिक स्वामी मंदिर स्ट्रटचे अध्यक्ष दिलीप ठाकरे, राजेंद्र मिस्तरी, अरूण ठाकरे, कैलास माळी, पुण्या पावरा, प्रविण माळीच, शत्रुघ्न माळी, पिंटू भिल, कल्पेश सोनार, मुकेश वळवी, राकेश वळवी, मिलींद मिस्तरी आदींचे सहकार्य लाभले.

 

LEAVE A REPLY

*