सर्वपक्षीय नेते उमेदवाराच्या शोधात

0

दत्तात्रय सूर्यवंशी,तळोदा ।-तळोदा नगरपालिकेची निवडणूक डिसेंबरमध्ये होत आहे. सर्वचपक्ष तगडे उमेदवार शोधण्याचा प्रयत्नातून उमेदवारी घेता का उमेदवारी करत धनाढय व बलाढय उमेदवार शोधण्याचा प्रयत्नातून घरोघरी फिरतांनाची चर्चा आहे.

तळोदा नगरपरिषदेचा पंचवार्षिक कार्यकाल दि.24 डिसेंबरला पूर्ण होणार आहे. निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रसे आदींनी शड्डू ठोकून निवडणुक लढवण्याचे संकेत दिले आहेत.

निवडणुकीत आपलाच उमेदवार निवडून यावा, पालिकेची सत्ता आपल्या हातात यावी, सत्ता हाता असली की पक्षांतंर्गत वरिष्ठ पातळीवर स्थानिक कार्यकर्ते पदाधिकारी यांचे वजन वाढते म्हणून काहींना आपले वजन वाढवण्यासाठी तर काहींना आपले वजन कायम ठेवण्यासाठी पालिकेत बहुमत मिळवायचे आहे.

यातून उमेदवारांची शोध मोहिम सुरू आहे. निवडणूक जिंकण्यासाठी मतांची आवश्यकता असते. समाजाची संख्या, उमेदवारांची श्रीमंती, कार्यकर्त्यांची फळी, पक्षाचा आर्थिक सहभाग, प्रचारांचे तंत्र, जनसंपर्क शेवटी व्यक्तीचे व्यक्तीमत्व बघुन मतदान मिळते. उमेदवार धनाढय व बलाढय असला की, अर्धी निवडणुक जिंकल्यासारखे असते.

म्हणून सर्वच पक्ष समाजाची लोकसंख्या जास्त व आर्थिक दृष्टया सक्षम उमेदवार मिळवण्याचा प्रयत्नात आहे. त्यासाठी आपल्या पक्षाचा काय अन विरोधी पक्षाचा काय ?

त्याला आपल्या पक्षात उमेदवारीसाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. उमेदवारी करू शकणार्‍यांचा घरी जावून विचारणा करावी लागत आहे ते ही पक्षाचा हिस्सा किती असेल याबाबत खात्री करून घेत आहेत व आपली उमेदवारी निश्चित करीत आहेत.

काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी भरत माळी कुटूंबियांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. पक्षाची धुरा तेच सांभाळत असल्याने पक्षाच्या वरिष्ठांनी त्यांच्यावर विश्वास टाकला आहे.

भारतीय जनता पक्षात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी चढाओढ आहे. शहराध्यक्ष हेमलाल मगरे, जिल्हा नेते अजय परदेशी व प्रांत पदाधिकारी डॉ.शशिकांत वाणी यांनी उमेदवारी मागितली आहे.

देशात मोदी लाट आहे. त्याचा अनुभव सर्वदूर येत आहे. नगराध्यक्षांची निवड थेट जनतेतून मतदानाने होणार आहे. यापुर्वी 1977 व 2002 मध्ये जनतेतून थेट मतदान पध्दतीमुळे भाजपाचे गुलाल बुलाखी माळी व विमलबाई काशिनाथ सोनवणे हे निवडून आले होते.

म्हणून पक्षात व कार्यकर्त्यात मोदी लाट व थेट जतेनतून निवडणूक कॅश करण्यासाठी भाजपाच्या इच्छुकांमध्ये शर्यत सुरू आहे.

यामुळेच इतर पक्षांतून भाजपाच्या गोटात स्वपक्षाची निष्ठेची राखरांगोळी करत भाजपाच्या तंबूत आश्रय घेण्यासाठी रिघ लागली आहे. आज परिस्थिती काहीही असो उत्तर येणारा काळ देणार आहे.

 

LEAVE A REPLY

*