नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांना वीज पुरवणार – मुख्यमंत्री

0
राकेश कलाल / विलास पवार | नंदुरबार : नंदूरबार जिल्ह्यातील सर्व महसुली गावांना वीज पुरवठा करणार आहे. त्यासाठी मध्य प्रदेश सरकारचीही मदत घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे झालेल्या सभेत जाहीर केले.

पुढे बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, दुर्गम भागात वैद्यकीय अधिकारी निवासी राहतील याबाबतच्या सुविधा पुरविणार आहेत. जिल्ह्यातील सर्व समस्या प्राधान्याने सोडविणासाठी प्रयत्न करणार आहे

. यासोबतच आरोग्य विभागातील ३०० रिक्त पदे भरणार असून या जिल्ह्यातील विकास कामांचा आढावा घेणार आहे. आदिवासींच्या आमचूर प्रक्रियेचे बँ्रडंींग करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांचे साळवे ता. शिंदखेडा येथे आगमण झाले. तेथे जि.प.डिजीटल शाळेचेे उदघाटन त्यांनी केले. यावेळी साळवे शिवारात झालेल्या जलयुक्तच्या कामांची पाहणी त्यांनी केली.

यासोबतच साळवेत आवास योजनेतील कामांची पाहणीही केली. यावेळी साळवेत शेतकरी संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर केले. त्यानंतर मुख्यमंत्री आढावा बैठकीसाठी शिंदखेड्याकडे रवाना झाले आहेत.

 

LEAVE A REPLY

*