तळोदा शहरातील घरफोडी चोरीचा गुन्हा उघडकीस: देशदूत वृत्ताची दखल

0

मोदलपाडा ता. तळोदा । वार्ताहर-तळोदा शहर व परिसरातील पोलीस ठाण्यात घरफोडी, चोरीच्या घटनेत वाढ झाली होती. याबाबत दैनिक देशदूतने वृत्त प्रकाशित केले होते.

त्या वृत्ताची दखल घेत पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला धडक कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार पथकाने 1 लाख 49 हजार रुपयांचे दागिन्यांसह दोघांना अटक केली आहे.

तळोदा परिसरात दि.8 ऑक्टोबर रोजी फिर्यादी नितीन सुभाष वाणी रा.वाणी गल्ली (तळोदा) यांच्या राहत्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून 1 लाख 20 हजाराचे सोने चांदीचे दागिने चोरून नेले होते.

याबाबत अज्ञात चोररट्याविरुद्ध पोलीस ठाणे येथे गु र नं 179/2017 भादवि कलम 454, 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

तसेच वारंवार घरफोडयांच्या घटना घडत होत्या. याबाबत दैनिक देशदूतने दि. 23 ऑक्टोबर रोजी पोलीसांच्या अकार्यक्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करत वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दखल घेतली.

पोलीस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार यांनी तपासणी पथक स्थापन केले.

या पथकास मार्गदर्शक सूचना देऊन नाउघड गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचित करण्यात आले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकास, एक इसम हा तळोदा येथील चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल विक्री करण्यासाठी नंदुरबार शहरातील सराफ बाजार परिसरात फिरत असल्याची बातमी दि.26 रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली.

त्यानुसार या पथकाने सराफा बाजार परिसरात सापळा रचून मोहम्मद मोसीन अहमद रा. उनपतीया अकसानगर सचिन जेआयडी सुरत (गुजरात) याला अटक केली.

तो कापडी पिशवीत सोन्याची मंगळपोत व इतर ऐवज घेऊन जाताना आढळला. त्यास ताब्यात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा नंदुरबार येथे आणून विचारपूस केली असता साथीदार गणेश दिलीप पाडवी रा.भवर ता.तळोदा यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली.

त्याच्याकडून एकूण 1 लाख 49 हजार किमतीचे सोन्या चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यातील आरोपींकडून इतर गुन्हे देखील उघड होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पोलीस अधीक्षक संजय पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत वाघुंर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किशोर नवले तसेच सपोनि न्हायदे रवींद्र लोंढे, प्रदीप राजपूत, भटू धनगर, पंढरीनाथ ढवळे, संदीप लांडगे, पो.ना महेंद्र सोनवणे, (चालक), मोहन ढमढेरे यांनी कामगिरी पार पडली. पुढील कारवाई कामी तळोदा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले असून फरार आरोपीचा शोध घेण्यात येत असून आरोपितांकडून तळोदा शहरातील काही न उघड गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे घरफोडी चोरीतील आरोपी सापडल्याने तळोदा शहरातील नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

पथकाला 15 हजाराचे बक्षिस
आरोपी मोबिन मोहम्मद अहमद शेख (वय 23)भंवर गणेश दिलीप पाडवी यांना नंदुरबार येथे सोन विकण्यासाठी आले असतांना काल रात्री ताब्यात घेण्यात आले.

याबाबत नवले व त्यांचा चमुला 15हजार रुपये रोख जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील जाहीर केले आहे. जिल्ह्यात जे पोलीस चांगले काम करतील त्याना फिरते चषक देण्यात येईल.

उकृष्ठ तपास लावल्याबाबत दखल घेऊन पोलिसांना प्रोत्साहित करण्यात येईल. तळोदा शहरात आचारसंहिता लागू झाल्यावर दोन स्तरावर मिटिंग घेऊन आवश्यक त्या सूचना देण्यात येईल हातात दगड असेल तर लाठीचा वापर होईल.

LEAVE A REPLY

*