फटाकेमुक्त दिवाळी उपक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

0

चेतन इंगळे,मोदलपाडा ता.तळोदा । दि.12 ।-या वर्षीची दिवाळी प्रदूषणमुक्त साजरा केली जावी, यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून राज्यातील सर्व शाळांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान राबविले गेले आहे.

याबाबत शिक्षण विभागाने परिपत्रक काढले असून शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती मागील दहा वर्षापासून राबवित असणार्‍या फटाकेमुक्त दिवाळी अभियानाला एकप्रकारे शासनाची राजमान्यता मिळून राज्य शासनाच्या शिक्षण विभागाची मोहरच उमटली आहे.

महाराष्ट्र अंनिसने देखील शासनाच्या या निर्णयाचे स्वागत व शासनाचे अभिनंदन केले आहे. विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

दिवाळी उत्सवात फटाक्यांची आतिषबाजी करून हवेचे व ध्वनीचे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असते.याबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जनजागृतीची गरज लक्षात घेता राज्याच्या उदयोग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री यांच्या वतीने प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान-2017 हि संकल्पना रब्बीण्यात येणार होते.

त्यात आज दि.10 ऑक्टो रोजी सकाळी 10.15 वाजता कोर्ट यार्ड, तळमजला, मुख्य इमारत, मंत्रालय येथे मुबईतील सुमारे 500 विद्यार्थ्यांना प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियानाची शपथ मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्यासह पर्यावरण, वन, कॅबिनेट व राज्यमंत्री तसेच राज्याचे मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव, पर्यावरण विभागाचे अपर आयुक्त, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष, सदस्य सचिव आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात येणार होती.

परंतु मुंबईत राबविला जाणारा हा उपक्रम राज्यातील सर्व शाळांमध्ये एकाच वेळी राबविला जावा, याबाबत परिपत्रक काढून राज्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालयांना या उपक्रमात सहभागी करून घ्यावे, अश्या सूचनेचा पत्र उदयोग व खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री यांच्याकडून शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालयाला देण्यात आले होते.

त्यावर कार्यवाही करत राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने परिपत्रक काढून राज्यातील सर्व विभागाच्या शिक्षण उपसंचालकांना व सर्व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांना शाळांमधून प्रदूषणमुक्त दिवाळी अभियान राबविण्याबाबत सूचित केले आहे. त्यानुसार उद्या राज्यातील सर्व शाळांमध्ये सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास प्रदूषणमुक्त दिवाळी संकल्प अभियान-2017 राबविले जाणार असून त्यात दिवाळीत विद्यार्थ्यांना फटाके न फोडण्याची तसेच वर्षभरातील सण-उत्सव साजरा करतांना प्रदूषणमुक्त साजरा करण्यासाठी कटिबद्ध राहण्याची शपथ देण्यात येणार आहे.

दरम्यान,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यामार्फत 2007 पासून राज्यात फटाकेमुक्त दिवाळी हे अभियान राबविले जाते. त्यात विद्यार्थ्यांकडून पालकांच्या सहीने दिवाळीत फटाके न फोडण्याची संकल्पपत्रे भरून घेण्यात येतात.

संकल्प पत्रे भरून घेताना अंनिसच्या कारकर्त्यांकडून शाळा-महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना फटाके फोडल्यामुळे होणारे वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पर्यावरणाचा होणारा र्‍हास, बालमजुरीला मिळणारे प्रोत्साहन, फटाक्यांमुळे होणारी जीवित व वित्त हानी आदी बाबी समजावून सांगण्यात येतात.

त्यासाठी व्याखान, पथनाट्य सादरीकरण, चित्रकला, निबंध स्पर्धा, पुस्तक प्रदर्शन आदी प्रकारांचा वापर करण्यात येतो.
महाराष्ट्र अंनिसच्या या फटाकेमुक्त दिवाळी अभियानाला जेष्ठ संशोधक डॉ.जयंत नारळीकर,सामाजिक कार्यकर्ते प्रा.एन.डी. पाटील, डॉ.प्रकाश आमटे, अभिनेता नाना पाटेकर, अर्थ तज्ञ डॉ.नरेंद्र जाधव, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आदींनी पाठींबा दिला व त्याच्या सहीचे फटाकेमुक्त व प्रदूषणमुक्त दिवाळी साजरा करण्याचे आवाहन पत्र शाळा-महाविद्यालयात महाराष्ट् अंनिसच्या दरवर्षी लावण्यात येते.

मागील वर्षी महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्यभरातील 1740 शाळांमधील सुमारे 5 लाख 91 हजार विद्यार्थ्यांपर्यत पोहचून 16 कोटी 90 लाख रुपये बचतीचा संकल्प विद्यार्थ्यांकडून करवून घेण्यात आला होता. यावर्षी मागील पंधरा दिवसांपासून राज्यभराय महाराष्ट्र अंनिसच्या वतीने शाळा-महाविद्यालयात फटाकेमुक्त व प्रदूषणमुक्त दिवाळीचा जागर सुरु आहे.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय व क्रीडा विभागाने त्याबाबत अधिकृत परिपत्रक काढून महाराष्ट्र अंनिसच्या या उपक्रमाला राजमान्यताच दिली आहे.

याप्रमाणेच केवळ दिवाळीच नव्हे तर विविध धर्मातील वर्षभर साजरा केले जाणारे सण-उत्सव,वाढदिवस,निवडणुकांचे निकाल, मिरवणुका अश्या प्रसंगी देखील प्रदूषणकारी फटाक्यांच्या वापर टाळावा असे, आवाहन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

*