नवापूर महसूल कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

0

नवापूर । प्रतिनिधी-राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांसंदर्भात काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नवापूर महसूल कर्मचारी आजपासून या अंदोलनात सहभागी होऊन तहसीलदार प्रमोद वसावे यांना मागण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले.

या निवेदनात, पूरवठा विभागातील पूरवठा निरिक्षक हे पद सरळ सेवेने भरण्याची कार्यवाही करीत आहे. त्यामुळे अव्वल कारकून संवर्गातील पद्दोनती रखडणार असून त्यांचावर आन्यय होणार आहे.

या भरती प्रक्रियेस स्थगीती देण्यात यावी महसूल कर्मचार्‍यांच्या प्रलंबीत मागण्या संदर्भात अनेकवेळा निवेदन देवून तसेच आंदोलन करूनदेखील त्याबाबत शासन स्तरावर कूठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

त्यामुळे महसूल कर्मचार्‍यांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून निर्णय पारित होई पर्यंत दि 11 ऑक्टोबर पासून बेमूदत कामबंद अंदोलन करण्यात येत आहे.

याप्रसंगी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, कार्याध्यक्ष मिलींद निकम यांच्या नेतृत्वाखाली तहसिल कार्यालयाचा आवारा बाहेर निदर्शन करून तहसिलदार प्रमोद वसावे यांना निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

*