शहीद मिलींद खैरणार यांचे पार्थिव नाशिकच्या ओझर विमानतळावर दाखल

0
Nandurbar | जम्मू काश्मीर येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले  मिलिंद खैरनार यांचे पार्थिव भारतीय वायुसेनेच्या विमानाने ओझर विमानतळावर आणण्यात आले.

यावेळी लष्करी इतमामात वायुसेनेच्या अधिकाऱ्यांकडून मानवंदना देण्यात आली. त्यानंतर वायुसेनेचे एअर कमांडीग ऑफिसर एस. के. जैन, नाशिक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.,

जिल्हा पोलिस अधीक्षक संजय दराडे,  प्रांतधिकारी महेश पाटील  यांचेसह उपस्थित सर्व वायुसेना अधिकारी आणि त्यांचे आप्तेष्ट व नातेवाइक यांनी शहीद मिलिंद खैरनार यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रध्दांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

*