शहादा येथे साडे सहा लाखाची घरफोडी

0

शहादा । दि.11 । ता.प्र.-शहरातील वृंदावननगर भागातील सेवानिवृत्त शिक्षकाने गच्चीवर टाकलेला गहू खाली उतरविण्याचा बहाण्याने अज्ञात गुरख्याने घरातील लाकडी कपाटातील 22 तोळे 4 ग्रॅम सोने असा एकूण सहा लाख 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

ही घटना दि.7 रोजी घडली. आज शहादा उपविभागीय पोलीस उपाधिकारी महारू पाटील व पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसेतज्ञ व श्वानपथकास पाचारण करण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, वृंदावननगर प्लॉट क्र.359, हरि-या-अली नागरी सहकारी पतसंस्थेस लागून सेवानिवृत्त शिक्षक मोहन काशिराम पाटील, पत्नी मिराबाई मोहन पाटील हे वयोवृद्ध दाम्पत्य राहतात. त्यांच्याकडे गहूचा साठा होता.

भाद्रपद महिना असल्यामुळे त्यांना दि.6 रोजी गहू घराच्या गच्चीवर टाकावयाचे होते. वयोवृद्ध दाम्पत्य असल्याने त्यांना ते शक्य नव्हते. सकाळी गुरखा तेथून जात होता. त्याला त्यांनी गहू टाकण्यास सांगितले. त्या मोबदल्यात पैसे देण्याचे ठरले. पहिल्या दिवशी त्या गुरख्याने गहू टाकला.

दुसर्‍या दिवशी दि.7 रोजी गुरखा गहू उतरविण्यासाठी परत आला. पाटील दाम्पत्य गच्चीवर उभे होते तर गुरखा खाली नेवून गहू टाकत होता. त्या दरम्यान तो घरात फिरत होता.

दरम्यान, मोहन पाटील हे सहज खाली आले आणि विचारणी केली की तू घरात काय करतो आहे. त्याने पाणी पिण्याचा बहाणा केला व गुरखा पुन्हा गहू उतरवू लागला.

त्याचदरम्यान मोहन पाटील यांना नातेवाईकांचा भ्रमणध्वनी आला ते पत्नी मिराबाई यांना सांगून घरातून निघून गेले. वयोवृद्ध महिला गच्चीवर गहू भरत होती. त्या

चा फायदा घेत त्या अज्ञात गुरख्याने घरातील स्वयंपाक रुमला लागून असलेल्या लाकडी कपाटातून 75 ग्रॅमच्या 4 बांगड्या, 55 ग्रॅमच्या दोन पाटल्या, 40 ग्रॅमची सोनसाखळी गोफ, 30 ग्रॅमचे मंगळसूत्र, 8 ग्रॅम कर्णफुल, 3 ग्रॅम कर्णफुल कॅप, 8 ग्रॅम दागिना व 5 ग्रॅमची एक अंगठी असा एकूण 22 तोळे 4 ग्रॅमचा 6 लाख 25 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

ही घटना पाटील कुटूंबियांना दि.8 तारखेस लक्षात आली. त्यांनी घरात पूर्ण तपासले. मात्र तो ऐवज सापडला नाही. म्हणून त्यांना त्या गुरख्यावर संशय व्यक्त केला.

याबाबत शहादा पोलीसांना माहिती दिली. पोलीस उपअधिक्षक महारू पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बडगुजर, प्रकाश जाधव यांनी घटनास्थळी भेट दिली. ठसेतज्ञ व श्वानपथकाला पाचारण करण्यात येत आहे. पोलीसांनी घटनेचा पंचनामा केला आहे.

LEAVE A REPLY

*