बापूजींच्या आदर्शवादी दूरदृष्टीतूनच नंदुरबारमध्ये शिक्षणाचा विस्तार;आ.डॉ.सुधीर तांबे यांचे प्रतिपादन

0

नंदुरबार । दि.11 । प्रतिनिधी-कै.गजमल तुळशीराम पाटील उर्फ बापूजींच्या आदर्शवादी दूरदृष्टीतूनच नंदुरबारसारख्या अतिशय दुर्गम आणि प्रतिकुल परिस्थिती असलेल्या आदिवासी व ग्रामीण प्रांतांमध्ये शिक्षणाचा प्रचार व प्रसार झाला आणि त्यातूनच नंदुरबारच्या पुढील अनेक पिढ्या यशोशिखावर पोहोचल्या असे प्रतिपादन आ.डॉ.सुधीर तांबे यांनी नंदनगरीमध्ये झालेल्या कै.गजमल तुळशीराम पाटील उर्फ बापूजी यांच्या स्मृती समारोहानिमित्त नंदुरबार तालुका विधायक समिती परिवारातील गुणवंतांचा सन्मान समारंभाप्रसंगी केले.

या सत्कार समारंभाचे अध्यक्ष आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी बापूजी आणि भैय्यासाहेब रघुवंशी यांच्या आठवणींना उजाळा देत शिक्षक आणि विद्यार्थी हा देशाचा कणा आहे. आपण एक विधायक परिवारात विधायक कार्य करीत आहोत आणि असेच कार्य पुढेही करीत राहू अशा प्रकारचा ठाम निश्चय व्यक्त केला.

आपल्या मनोगतातून आ.डॉ.सुधीर तांबे पुढे म्हणाले की, जी.टी. बापूंजींचे व्यक्तिमत्व हे विविधांगी होते. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात नावलौकीक केला आणि मोठे परिवर्तन निर्माण केले.

त्यांनी समकालीन असलेली पिढीही आदर्शवादी, ध्येयवादी आणि नैतिकतेच्या बाबतीत कधीच तडजोड न करणारी होती म्हणूनच त्यांनी या क्षेत्राचा विकासाचा पाया उभारला.

प्रमुख अतिथी धुळे जि.प. चे अध्यक्ष शिवाजीराव दहिते यांनी नंदुरबार तालुका विधायक समितीचा विकास करण्यात बापूजी व दादासाहेब रघुवंशी यांनी कठोर परिश्रम घेतले असे प्रतिपादन केले.

धुळे जि.प. समाजकल्याणचे सभापती मधुकरराव गर्दे यांनी आपल्या विनोदी शैलीत स्व.बापूजी आणि दादासाहेब रघुवंशी यांच्या अविस्मरणीय आठवणी सांगून त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

साने गुरूजी वि.प्र.मंडळाचे अध्यक्ष दीपक पाटील यांनी शिक्षकांचे कार्य हे खूप महान आहे आणि त्यांचा सन्मान बापूजींच्या स्मृती समारोहानिमित्त दरवर्षी नं.ता.वि.स. करत शैक्षणिक क्षेत्रात एक आदर्श उभा केला आहे, असे मनोगत व्यक्त केले.

नंदुरबार जि.प. चे अध्यक्ष भरत गावीत यांनी बापूजींनी स्थापन केलेल्या संस्थेतून आमच्यासारखे हजारो विद्यार्थी शिक्षण घेऊन खर्‍या अर्थाने स्वावलंबी झाल्याचे म्हटले.

या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष मनोज रघुवंशी, जि.प. अध्यक्षा सौ.रजनीताई नाईक, शिरीष नाईक, नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी, बापूजींच्या कन्या श्रीमती कमलताई पाटील, नंदुरबार पं.स. सभापती सौ.रंजना नाईक, उपसभापती ज्योताताई बापू पाटील, रविबापू पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, कृ.उ.बा.समितीचे सभापती भरत पाटील, शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के. पाटील, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

*