नंदुरबार जिल्ह्यातील 30 ग्रामपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व काँग्रेसकडे 17 ग्रामपंचायती

0
नंदुरबार। प्रतिनिधी-जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतपैकी 30 ग्रामपंचायतींवर भाजपा तर 17 ग्रामपंचायतीने काँग्रेसने वर्चस्व सिध्द केल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय राष्ट्रवादीने 2 तर भाकपा व शिवसेनेने प्रत्येकी एका ग्रामपंचायतीवर वर्चस्वाचा दावा केला आहे.

जिल्ह्यातील 51 ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया घेण्यात आली. यात भाजपाने 30 ग्रामपंचायतींवर तर काँग्रेसने 17 ग्रामपंचायतींवर वर्चस्व सिध्द केल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय शिवसेना व राष्ट्रवादीने प्रत्येकी दोन तर भाकपाने एका ग्रामपंचायतीवर वर्चस्व सिध्द केल्याचा दावा केला आहे.

या दाव्यानुसार नंदुरबार तालुक्यातील करणखेडा, कानळदे, तलवाडे, अमळथे, ओसर्ली, सातुर्खे, अक्कलकुवा तालुक्यातील खापर, कुकडीपादर, डनेल, मणिबेली, मोलगी, बिजरीगव्हाण, भाबलपूर, घंटाणी, अलीविहिर, अक्कलकुवा, शहादा तालुक्यातील कळंबु, खैरवे, धांद्रे, निंभोरा, बहिरपूर, बिलाडी, म्हसावद, नवापूर तालुक्यातील नानगीपाडा, खडकी, खेकडा, वावडी या ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत. तर नंदुरबार तालुक्यातील ढंढाणे, रजाळे, आसाणे, तिसी, घोटाणे, तळोदा तालुक्यातील राजविहिर, अक्कलकुवा तालुक्यातील पोरांबी, डेब्रामाळ, भगदरी, विरपूर, नवापूर तालुक्यातील शेही, भांगरपाडा, वराडीपाडा, शेगवे, विसरवाडी,वाटवी, गंगापूर या ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात आल्या आहेत.

तसेच नंदुरबार तालुक्यातील रनाळे व अक्कलकुवा तालुक्यातील सोरापाडा ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

याशिवाय नंदुरबार तालुक्यातील चौपाळे, शहादा तालुक्यातील पाडळदा व नवापूर तालुक्यातील अंटीपाडा ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

 

 

LEAVE A REPLY

*