सातपुडा साखर कारखान्याचा उद्या अग्नीप्रदीपन सोहळा

0

शहादा । दि.10 । ता.प्र.-सातपुडा तापी परिसर सहकारी साखर कारखाना 43 वा बॉयलर प्रदीपन सोहळा व चेअरमन दिपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन कार्यक्रम दि.13 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी व सौ.राजश्रीताई कलशेट्टी यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेअरमन दिपक पाटील उपस्थित राहणार आहेत.

या समारंभास सर्व मान्यवरांनी उपस्थित रहावे असे आवाहन व्हा.चेअरमन प्रेमसिंग आहेर, संचालक प्रल्हाद गोविंद पाटील, पंडीतराव भावराव पाटील, दशरथ विठ्ठल पाटील, संभू फकिरा पाटील, अनिताबाई पाटील, ज्ञानदेव पाटील, संजय जगन्नाथ पाटील, कल्पनाबाई पाटील, एकनाथ रामू पाटील, सुनिल मथुर पाटील, रतिलाल भिक्कन पाटील, लक्ष्मण पुनाजी चौधरी, शशिकांत गोविंद पाटील, भुट सखाराम चौधरी, महेंद्रसिंग गिरासे, शशिकांत काशिनाथ पाटील, जयप्रकाश रामदास पाटील, ओंकार जगन्नाथ चौधरी, उध्दव पाटील, प्रकाश पाटील, संदिप पाटील, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील आदींनी केले आहे.

दि.13 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपनगराध्यक्षा रेखाताई चौधरी, व्हा.चेअरमन प्रेमसिंग आहेर, कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, लोकनायक जयप्रकाश सुतगिरणीचे व्हा.चेअरमन रोहिदास पाटील, कार्यकारी संचालक आर.डी. पाटील, पुज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष किशोर पाटील, समन्वयक मकरंद पाटील, शहादा तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन राजारामभाई पाटील, व्हा.चेअरमन जगदिश पाटील, शहादा तालुका दुध उत्पादक संघाचे चेअरमन रविंद्र केसरसिंग राऊळ, व्हा.चेअरमन आनंद पाटील, कृउबासचे सभापती सुनिल सखाराम पाटील, उपसभापती रविंद्र राऊळ, पुरूषोत्तम पतपेढीचे चेअरमन सुनिल पाटील, व्हा.चेअरमन तुकाराम गोविंद पाटील, कमलताई ग्रामीण पतसंस्थेचे चेअरमन मकरंद पाटील, व्हा.चेअरमन राजाराम पाटील आदींनी केले आहे.

LEAVE A REPLY

*