जिल्ह्यातील किटकनाशक विक्रेत्यांची आढावा बैठक

0

नंदुरबार । दि.10 । प्रतिनिधी-नंदुरबार। प्रतिनिधी- नंदुरबार जिल्ह्यातील तहसिलदार, कृषी अधिकारी व जिल्ह्यातील तहसिलदार, तालुका कृषी अधिकारी व पेंचायत समितीचे कृषी अधिकारी व जिल्ह्यात कार्यरत किटकनाशक कंपनी व विक्रेते यांचे प्रतिनिधी यांची नुकताच परिस्थितीचा आढावा घेतला.

संरक्षणाकरीता किडनाशके, बुरशीनाशके, तणनाशके वापरताना, हाताळतांना शेतकर्‍यांनी घ्यावयाची काळजी ती लेबल, लीफलेट वरील सुूचनांचे पालन करूनच काळजपीर्वुक हाताळले आणि वापरले पाहिजेत. ती व्यवस्थित हाताळले नाही तर मोठे अनर्थ होवून पिकांचे नुकसान तर होतेच परंतु प्रसंगी प्राणहानी ही होते.

पिकांचे नुूकसान व प्राणहानी टाळण्याकरीता ध्यावयाच्या काळजीबाबत शासनासोबत सर्व विक्रेते व कंपनी यांनी व्यापक प्रचार व प्रसिध्दी मोहिम हाती घ्यावी. असे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

आपल्या जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे आदिवासी, गरीब व अशिक्षीत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा विक्री कराव्यात व त्यासोबतच तांत्रिक माहिती सोप्या भाषेत समजून सांगावी.

कोणत्याही परिस्थितीत मान्यता नसलेले किंवा बनावट औषधे विक्री करू नये, अन्यथा अशा बेकायदेशीर विक्री कर णार्‍या विक्रेते व कंपनीवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले.

तसेच जिल्ह्यात चिनीबनावटीचा फवारणी पंपाची विक्री करू नये, चिनीबनावटीचे फवारणी पंपामुळे फवारणी करताना होणारी विषबाधेची शक्यता लक्षात घेता पंप विक्री करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार यांनी दिले.

फवारणीसाठी औषधे विक्री करताना थेट लाल त्रिकोनाचे चिन्ह असलेल्या अति विषारी गटातील किटकनाशकांची विक्री न करता पिवळे, निळे, हिरवे, त्रिकोनाचे चिन्ह असलेल्या सौम्य विषारी किटकनाशकाची लेबल क्लेमनुसार विक्री करावी. तसेच सोबत दिलेल्या माहितीचे बोर्ड आपल्या दुकानात दर्शनीभागात लावावेत असे निर्देश कृषी विकास अधिकारी यांनी दिले आहेत.

पीक संरक्षणाकरीता किडनाशके बुरशीनाशके, तणनाशके वापरतांना, हाताळतांना शेतकर्‍यांनी घ्यावयाची काळजी ती लेबल, लीफलेट, सुचनांचे पालन करूनच काळजीपुर्वक हाताळले आणि वापरले पाहिजेत.

एकाच रोगावर किडीवर वेगवेगहया प्रकारची औषधी बाजारात उपलब्ध आहेत. कीड रोेगांची नीट ओळख करून सुयोग्य औषधाची निवड करावी, कृषी विद्यापीठाच्या फारशीप्रमाणेच औषधे वापरावीत औषधांची फवारणी आलटून पालटून करावीत, अनेक औषधे एकत्रित मिसळून फवारणी करावी, शिफारशीप्रमाणे औषधाची मात्रा माजुनच घ्यावी.

योग्य खुणा असलेले मोजणी पात्र वापरावे. बाटलीच्या बुचावर औषधे मोजु नयेत, लेबल नसलेले औषधे वापरून नयेत, लेबलमध्ये दिलेल्या पीक किडीकरीता संबंधित औषधांचा दिलेल्या प्रमाणाताच वापर करावा, तयार केलेले औषधांची फवारणी लगेच करावी.

फवारणीसाठी सर्व औषधे वापरावे, शिल्लक राहणार नाही याची काळजी घ्यावी, किटकनाशक किंवा बुरशीनाशक खरेदी करतांना त्याचे व्यापारी नाव, तांत्रिक दिनांक व अंतिम मुदत वापरण्याची योग्य वेळ यांची खात्री करून परवानाधारक विक्रेत्यांकडून पक्की पावती बील घ्यावी, पावतीवर विक्रेत्याचा परवाना क्रमांक छापलेला असावा, खरेदी केलेले किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके स्वतंत्रणपणे साठवणूक करावीत.,लहान मुले यांच्यापासून सुरक्षित अंतरावर ठेवावेत.

खतांबरोबर साठवणुक करू नये, जनावरांच्या गोठयाजवळ, गोठयामध्ये साठवणूक करू नये, ती थंड व कोरडया सुरक्षित जागी साठवणूक करावी, किटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके फवारणी करतांना हातमोजे वापरावेत, तसेच नाक व तोंडाजवळ मास्क किंवा रूमाल वापरावा, फवारणी वेळेत तंबाखू, पान, सुपारी, खावू नये, अन्न खाडू नये किंवा पाणी नि वू नये, उपाशीपोटी आजारी मजुराकडून फवारणी करून नये, तसेच आठ तासापेक्षा अधिक फेळ फवारणी करून नये, किटनाशके फवारणी वार्‍याच्या विरूध्द दिशेने करू नये, उंच पिकावर फवारणी करताना ते फवारणी करणार्‍या व्यक्तीच्या अंगावर व तोंडावर उडणार नाही याची काळजी घ्यावी, कृषी रसायनांची हाताळणी अथवा उपयोग करतांना नमुष्यास चेतावणी चिन्ह, चित्रालेख आणि रंग कोडींग पहाणे गरजेचे आहे. किटकनाशक कंटेनर या पुनर्वापर करणे टाळावे.

 

LEAVE A REPLY

*