नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा, तळोदा तालुक्यातीलग्रामपंचायतींचे निकाल जाहीर

0

देशदूत चमुकडून । दि.09 ।-नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा तालुक्यातील नुकत्याच झालेल्या 35 ग्रामपंचायतींचे निकाल आज जाहीर करण्यात आले.

यावेळी प्रथमच सरपंच निवड ही थेट जनतेतून होणार असल्याचे चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे या निवडणूकांकडेडे जिल्हयाचे लक्ष लागून होते.

जिल्हयात ग्रामपंचायतनिहाय विजयी सरपंच व ग्रा.पं.सदस्य पुढीलप्रमाणे-

नंदुरबार तालुका

नंदुरबार । प्रतिनिधी- तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीची प्रक्रिया आज येथील तहसिल कार्यालयात पार पडली. कुठलाही अनुचित प्रकार न घडता मतमोजणी शांततेत पार पडली. ग्रामपंचायत निहाय सरपंच व ग्रामपंचायत सदस्यपदी निवडून आलेले उमेदवार असे- आसाणे ग्रामपंचायत आसाणे ग्रामपंचायतीत चंद्रकांत युवराज पाटील  हे 702 मते मिळवून सरपंचपदी निवडून आले. त्यांचे प्रतिस्पर्धी भारत पंडीत पाटील यांना 450 मते तर मोतीलाल गोकुळ पाटील यांना 285 मते मिळाली. 9 जणांनी नोटाचा अवलंब केला. प्रभागनिहाय निवडून आलेले उमेदवार असे (कंसात मिळालेली मते) – प्रभाग क्रमांक 1 मध्ये रुपचंद काळु पाटील (390),  बेबीबाई छगन भिल (378), हिराबाई चतुर पाटील (339). प्रभाग क्रमांक 2 – नाना श्रीराम पाटील (286), अरूण धनराज पाटील (211), निर्मलाबाई खंडू पाटील (247). प्रभाग क्र.3 – किसन रुपचंद पाटील (205), चंद्रभागा बन्सीलाल पाटील (207), ललीताबाई भारत पाटील (180).अमळथे ग्रामपंचायत अमळथे येथील सरपंचपदी पवित्राबाई अजबसिंग गिरासे या 180 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी धनसिंग महादुसिंग गिरासे यांना 162 मते मिळाली. 4 जणांनी नोटाचा अवलंब केला.प्रभागनिहाय निवडून आलेले उमेदवार – प्रभाग क्रमांक 1- ग्यानाबाई अंबर ठाकरे, रमणबाई गुलाब कोळी. प्रभाग क्रमांक 2 – अरविंद रुपचंद कोळी (62), उदेसिंग जगतसिंग गिरासे (68) . प्रभाग क्रमांक 3 – शामा तान्हा ठाकरे, छायाबाई उखडू पवार, मिनाबाई मानसिंग राजपूत. चौपाळे ग्रामपंचायतचौपाळे येथील सरपंचपदी इंदुबाई बंडा भिल या 1291 मते मिळवून विजयी झाल्या आहेत. त्यांच्या प्रतिस्पर्धी हिराबाई लक्ष्मण वळवी यांना 828 मते मिळाली. 16 जणांनी नोटाचा अवलंब केला. प्रभागनिहाय निवडून आलेले उमेदवार – प्रभाग क्रमांक 1- वंशी भिका ठाकरे (252), विमलबाई रतन चौधरी (240), नोटा – 18.  प्रभाग क्र.2- पाडवी रतिलाल मोहन (368), महाजन साहेबराव यादव (386),  पटेल छायाबाई विठ्ठल (307). प्रभाग क्र.3 – पिंपळे वामन कृष्णा (340), ठाकरे मंगला कैलास (422), पटेल मायाबाई रोहिदास (405), प्रभाग क्र.4 – ठाकरे चंद्रसिंग कड्या (300), ठाकरे उज्वला माधवराव (295). रेखा सागर धामने (बिनविरोध).ढंढाणे ग्रामपंचायतढंढाणे येथील सरपंचपदी सोनवणे आक्काबाई श्रावण या 457 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी सोनवणे हिराबाई दाजमल यांना 286 मते मिळाली. 17 जणांनी नोटाचा अवलंब केला.प्रभागनिहाय निवडून आलेले उमेदवार असे- प्रभाग क्रमांक 1- विमलबाई अण्णा सोनवणे (177), नितीन वाल्मीक नागरे, नंदाबाई विजय गाभणे. प्रभाग क्रमांक 2 – ठाकरे रतन काळु (80), ठाकरे फुलसिंग हारसिंग (78), सोनवणे दशीबाई एकनाथ (71). प्रभाग क्रमांक 3 – ठाकरे आसुदेव झिपु (160), योगिता जितेंद्र ठाकरे, रंजूबाई सदाशिव पाडवी.धानोरा ग्रामपंचायतधानोरा येथील सरपंचपदी पाडवी मनोज सुदाम हे 1124 मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी वसावे तानाजी गोंजी यांना 879 मते मिळाली. 31 मतदारांनी नोटाचा वापर केला. प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे-प्रभाग क्रमांक 1 – पवार विक्रम फकिरा (306), वसावे मोहन करणसिंग (323), प्रभाग क्र. 2- पाडवी गजमल वेड्या (251), नाईक रेखा तुलसिराम (429), प्रभाग क्र.3 – वसावे मनोहर रामसिंग (411), वळवी नंदिनी ईश्वर (434), चौधरी भावनाबाई भिकाभाऊ (448), प्रभाग क्र.4- वळवी मनोज जालमसिंग (238), वसावे मिनाबाई मनोहर (442), वसावे सुमित्रा यशवंत (442), प्रभाग क्र.5 – वळवी राकेश मानसिंग (194), वसावे तनुजा मोहन (225), शर्मा नेहा सिताराम (226.घोटाणे ग्रामपंचायतघोटाणे सरपंचपदी पाटील प्रतिभा प्रकाश या 1100 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी धनगर कस्तुराबाई रतन यांना 405 मते मिळाली.  27 जणांनी नोटाचा वापर केला.प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे- बावा धुडकु लालगीर (309), धुडकू लालगीर बावा, धनगर सुनंदाबाई डिगंबर (356), प्रभाग क्र.2 – पाटील कला तुळशिराम (383),  बावा उषा विनोद (368), ताराचंद मोतीराम पाटील, प्रभाग क्र.3 – बावा हिम्मत दौलत (360), नारसिंग सुरसिंग भिल, हिरकणबाई दशरथ भिल.कानळदे ग्रामपंचायतकानळदे सरपंचपदी दीपक दशरथ पाटील हे विजयी झाले. प्रभागनिहाय विजयी झालेले उमेदवार असे- प्रभाग 1- सुनील धनराज पाटील, भिल वनिता रविंद्र, प्रभाग 2- भिल धर्मा भिका, पाटील सरलाबाई संभाजी, प्रभाग 3- पाटील मधुकर मटुलाल, भिल उषाबाई पिंटू, पाटील मनिषा अशोक. करणखेडा ग्रामपंचायतकरणखेडा येेथील सरपंचपदी वळवी काल्या गोविंद विजयी झाले. प्रभागनिहाय विजयी झालेले उमेदवार असे- प्रभाग 1- पठाण अयुबखान हुसेनखान, नाईक चीतु बुधा, चौधरी संगिता प्रल्हाद, प्रभाग 2- वळवी रमीलाबाई सुरेश, वळवी मोहन श्रावण, प्रभाग 3 – पाडवी छबीबाई डोंगर, नाईक लालदास गुलाब, नाईक नबीबाई मानसिंग. खैराळे ग्रामपंचायतखैराळे सरपंचपदी गावीत मिना रामचंद्र या 794 मते मिळवून विजयी झाल्यात. त्यांच्या प्रतिस्पर्धी गावीत रंजना कृष्णा यांना 547 मते मिळाली. 42 जणांनी नोटाचा वापर केला.प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे- प्रभाग 1- गावित रमेश फोज्या (268), गावीत सुशिला दिवाजी (296), साबळे फुलवंती संतोष (289), प्रभाग 2 – गवळी चंद्रकांत कनिलाल (178), गावीत प्रमिला श्रीलाल (195), पवार योगिता किसन (203), प्रभाग 3- चौरे वसंत चमू (256), गावित सतिश उतर्‍या (242) भोये कविता वासु (244).कोठडे ग्रामपंचायतकोठडे सरपंचपदी रीना कैलास वळवी विजयी झाल्या.  वळवी रिना कैलास यांना 415 मते तर गावीत राणूबाई भामट्या यांना 404 मते मिळाली. 14 जणांनी नोटाचा वापर केला.प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे- प्रभाग 1 – वळवी ओमन आनंदा (181), वळवी रिना कैलास (192), प्रभाग 2 – वसावे विपुल रामसिंग (143),  पाडवी सुनिता अमृत (125), प्रभाग 3 – नाईक हिरालाल जोरसिंग (169),  वळवी अनिता दारासिंग (177), नाईक सुनिताबाई महेंद्रसिंग (164).ओसर्ली ग्रामपंचायतओसली येथील सरपंचपदी गिरासे विजयसिंग प्रतापसिंग हे 594 मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी गिरासे हितेंद्रसिंग दरबारसिंग यांना 141 मते मिळाली. 9 जणांनी नोटाचा वापर केला. प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे- प्रभाग 1 – जगदाळे पंडीत दामु, दुबे रेखाबाई वसंतकुमार, प्रभाग 2- सोनवणे रघुनाथ मंगा, कोळी अंजना रतीलाल, प्रभाग 3- मालचे झुलाल हिलाल, सोनवणे जयंती नाना, भिल मोकाणी लावा.रजाळे ग्रामपंचायतरजाळे येथील सरपंचपदी पाटील रेखा शंकर या 815 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांच्या प्रतिस्पर्धी पाटील सरला धनराज यांना 697 मते मिळाली. 20 जणांनी नोटाचा वापर केला.प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे- प्रभाग 1- भिल गुलाब फुलसिंग (274), भिल अलकाबाई शामराव (299), गिरासे राजकोर मानसिंग (249), प्रभाग 2 – पाटील मनोज चिंटू (290), मराठे भावराव गोविंदा (315), पाटील सोनाली अरविंद (309), प्रभाग 3 – मराठे भटु जगन्नाथ (302), वाघ इंदू बापू (238), पानपाटील विद्या लालचंद  (245). रनाळे ग्रामपंचायतरनाळे येथील सरपंचपदी गवते तृष्णा प्रदिप या 2016 मते मिळवून विजयी झाल्या. त्यांचे प्रतिस्पर्धी  भिल एकनाथ काशिनाथ यांना 1407 मते मिळाली. 103 जणांनी नोटाचा अवलंब केला.प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे- प्रभाग 1- तांबोळी राकेश देवचंद, तांबोळी मालती रमेश, तांबोळी शोभा रमेश, प्रभाग 2- घुगे राकेश हरिभाऊ, पठाण अमिरखान इस्लामखान, आव्हाड कल्पना रविंद्र, प्रभाग 3- ठाकरे सुभाष रामा, भिल ताईबाई सोनू, नागरे मंगलाबाई लक्ष्मण, प्रभाग 4- शिंत्रे सुनिल बबन, जाधव शांताबाई वामन, भिल सखुबाई किसन, प्रभाग 5- शिंत्रे विजयकुमार सुरेश, चौधरी वामन रतिलाल, शिंत्रे ज्योती खंडू. सातुर्खे ग्रामपंचायतसातुर्खे येथील सरपंचपदी पाटील विजय विठ्ठल हे 968 मते मिळवून विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी पाटील काशिनाथ सजन यांना 506 मते मिळाली. प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे- प्रभाग 1- सोनी मिराबाई मोतीराम, ठाकरे रंजु मोतीराम, प्रभाग 2- पाटील कमलबाई जाधव, पाटील दिपक अशोक, प्रभाग 3- पाटील कमलबाई छगन, माळी लिलाबाई बन्सी, माळी श्रावण धडू. तलवाडे बु. ग्रामपंचायततलवाडे येथील सरपंचपदी पाटील निर्मला गोकूळ या विजयी झाले. प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे- प्रभाग 1- भिल उषा नाना, भिल बानुबाई सुका, भिल रोहिदास गुलज्या, प्रभाग 2- पाटील जिभाऊ चिंधा, पाटील मालू चंदन, पाटील साहेबराव खंडू, प्रभाग 3- पाटील अलका साहेबराव, भिल दारासिंग महारू, पाटील मिना रविंद्र. तिसी ग्रामपंचायततिसी सरपंचपदी पाटील कल्पना चतुर या विजयी झाल्या. प्रभागनिहाय विजयी उमेदवार असे- प्रभाग 1- भील रतन चिंतामण, भील वंदना अर्जुन, प्रभाग 2 – पाटील जयदेव पंडीत, पाटील भारतीबाई सतिलाल, प्रभाग 3 – पवार दाजभाऊ आनंदा, भील मथा नानसुक, पाटील रेखा किशोर.

शहादा तालुका

शहादा । ता.प्र.-तालुक्यातील पाच ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची मतमोजनी तहसिल कार्यालय झाली. यात कळंबु ग्रामपंचायतीच्या सरंपचपदी  सुवर्णाबाई हिमंत बोरसे, खैरवे-भडगाव सरंपचपदी शारदा प्रविण निकुंभे, धाद्रे सरपंचपदी शिवदास जोतेसिंग चित्ते, निभोरा सरंपचपदी ताईबाई रामचंद्र ठाकरे व बिलाडी त.ह. सरंपचपदी  गणेश पवार निवडुन आले आहे. दरम्यान कळंबु येथे समातंर झाले असुन पंचायत समिती सदस्य हिमंत बोरसे यांनी या ग्रामपचायतीवर पुन्हा वर्चस्व मिळविले आहे.कळंबू ग्रामपंचायततालुक्यातील कळंबु, खैरवे-भडगाव, निभोरा, धाद्रे व बिलाडी त.ह. या पाच ग्रामपंचायतीसांठी दि.7 रोजी मतदान झाले होते. यावेळी थेट ग्रामस्थांमधून सरंपच निवड होणार म्हणून या गावामध्ये प्रचाराची रणधुमाळी उठली होती. ग्रामपंचायतीवर वर्चस्व राखण्याठी स्थानिक नेतेही सक्रिय झाले होते. दि 7 रोजी पाचही ग्रामपंचायतीच्या सरंपच व सदस्यासाठी मतदान झाल्यानंतर आज दि 9 रोजी तहसील कार्यालयात मतमोजणी घेण्यात आली. यावेळी ग्रामीण भागातील कार्यकत्याची निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी होती. कळंबू ग्रामपंचायतीत यावेळी सत्तांतरण होऊन थेट सरंपचपदी  सुवर्णाबाई हिमंत बोरसे निवडुन आल्या. त्याना 1089 मते मिळाली. सदस्यपदी ललीत सुभाष बोरसे (249 मते), सायंकाबाई शिवदास कुवर (204 मते), सुरेश नामदेव कुवर (199 मते), भारती संजय पवार (315 मते), वासुदेव भिमराव बोरसे (265 मते) निवडुन आले तर सुवर्णाबाई बोरसे, किरण वाल्मिक बोरसे, वेडुभिल कागुबाई भिल, देवकाबाई देवरे बिनविरोध झाले आहेत. 11 पैकी पाच सदस्य पदाच्या जागा बिनविरोध झाल्या. त्यापैकी वार्ड क्र.4 मध्ये एका जागेसाठी नामनिर्देशन पत्र दाखल न झाल्याने ती जागा रिक्त आहे. कळंबू येथील निवडणूकीत सरपंच पद हे महिला ओबीसी राखीव होते. लोकनियुक्त सरपंचसाठी दोन पॅनल मध्ये सरळ लढत होती. यामध्ये पंचायत समिती सदस्य हिंमतराव बोरसे यांच्या नम्रता पॅनलवर माजी सरपंच प्रविण वाघ यांचा समता विकास पॅनल यामध्ये सरपंच पदासाठी दोन उमेदवारांमध्ये लढत होती. बोरसे सुवर्णाबाई हिंमतराव व तेजस्विनी प्रविण वाघ यांच्यात सरपंच पदासाठी सरळ लढत होती. लोकनियुक्त सरपंच सौ.सुवर्णाबाई बोरसे या 1089 बहुमतांनी विजयी झाल्या तर प्रतिस्पर्धी असलेल्या तेजस्विनी वाघ यांना 562 मते मिळाल्याने त्या पराभूत झाल्या. तर सदस्यांमध्ये वार्ड क्र.1 मधून ललित सुभाष बोरसे हे 251 मते घेवून विजयी झाले तर जगदीश विक्रम बोरसे हे पराभूत झाले. वार्ड क्र.2 मध्ये सर्वसाधारण स्त्री मध्ये सायंकाबाई शिवदास कुवर ह्या विजयी झाल्या. त्यांना 204 मते मिळाली असून भटीबाई रामराव देवरे या पराभूत झाल्या. वार्ड क्र.3 मधून सुरेश नामदेव कुवर (ना.मा.प्र.) हे 199 मतांनी विजयी झाले तर अशोक ताराचंद बोरसे हे पराभूत झाले. तर वार्ड क्र.4 मध्ये भारती संजय पवार ह्या 315 मतांनी विजयी झाल्या तर उखडू भाल्या भिल हे पराभूत झाले. सर्वसाधारण मध्ये वासुदेव भिमराव बोरसे हे 265 मत घेवून विजयी झाले तर प्रविण पंडीत वाघ हे पराभूत झाले.खैरवे-भडगाव ग्रामपंचायतखैरवे-भडगाव सरंपचपदी शारदा प्रविण निकुंबे (407 मते) तर सदस्यपदी कल्पना निकुंभे (142 मते), रमणबाई मक्कनसिंग गिरास?े (238 मते) निवडून आले. तर खंडु चव्हाण, तारसिंग पवार, कोकिळाबाई चव्हाण, राजेद्र पानपाटील, लताबाई मोरे बिनविरोध झाले आहेत. धांद्रे ग्रामपंचायतधाद्रे सरपंचपदी शिवदास जोतेसिंग चित्ते (141 मते), सदस्यपदी सतारसिंग लालसिंग भिल (133 मते) सुमन प्रताप मालचे (101 मते) निवडुन आले तर दत्तु फुलसिंग भिल, सुशिला मालचे, सुमन मालचे, साधना चतुर पाटील बिनविरोध झाले आहेत. निंभोरा ग्रामपंचायतनिभोरा ग्रामपंचायत सरंपचपदी ताईबाई ठाकरे (284 मते) सदस्यपदी कांताबाई राठोड (132 मते), पदमकोरबाई चतुरसिंग गिरासे (112 मते), दसाबाई भिला मालचे (116 मते) सजन गजमल भिल (69 मते), लक्ष्मीबाई वासुदेव भिल (77 मते) निवडुन आले आहेत. युवराज महिरे व ईश्वर भिल बिनविरोध झाले आहेत. निंभोरा ग्रा.पं. वर प्रगती पॅनलचे वर्चस्व कोंढावळ ता.शहादा । वार्ताहर वार्ताहर। तालुक्यातील निंभोरा ग्रामपंचायतीच्या 8 जागांसाठी निवडणुक लागली होती. त्यात दोन जागा बिनविरोध निवडुन आल्या व उर्वरीत सहा जागांसाठी मतदान झाले. त्यात वार्ड क्र. एकमधून प्रगती पॅनलचे विजय उमेदवार सरपंचपदी ताईबाई रामचंद्र ठाकरे विजयी झाल्या. कांताबाई प्रमोद राठोड, बिनविरोध युवराज रतन महिरे, वार्ड क्र. दोनमधून ईश्वर मोहन ठाकरे बिनविरोध, सजन गजमल भिल, लक्ष्मीबाई वासुदेव भिल हे निवडुन आले. तसेच लोकशाही पॅनलचे पद्मकोरबाई चतुरसिंग गिरासे, जसुबाई भिल मालचे हे दोन उमेदवार विजयी झाले. सरपंचपदाचे उमेदवार ताईबाई रामचंद्र ठाकरे या युवराज रतन महिरे माजी सरपंच यांच्या पत्नी आहे. मागील दहा वर्षांपुर्वी सरपंच म्हणून निवडुण आल्या होत्या. या निवडणुकीत प्रगती पॅनलचे प्रमुख कल्याणसिंग गिरासे व मंगलसिंग गिरासे, युवराज रतन महिरे, नाना निकुंभे, भरत नगराळे, रतिलाल राठोड, रामदास नगराळे, भावराव वजीर, मोनू रतन भिल, भटुलालचंद जाधव, गोपाळ राठोड आदींनी सहकार्य केले.   बिलाडी त.ह. ग्रामपंचायतबिलाडी त.ह.सरंपचपदी  गणेश हलदीराम पवार (272 मते) सदस्यपदी राजाराम ठाकरे (70 मते) निवडून आले.  सायजा बरडे, नबी पाडवी, प्रकाश ठाकरे, सुनिल खेडकर, प्रगती खेडकर, व बबीता पवार बिनविरोध झाले आहेत. निकाल घोषित होताच विजयी उमेदवारांचे सर्मथक गुलालाची उधळण करीत जल्लोष करीत होते, तर पराभूत गटात सन्नाटा पसरला होता. दरम्यान, मतमोजणी 5 टेबरवर करण्यात आली. तहसीलदार मनोज खैरनार, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, वाय.डी. पाटील, किशोर भादुगे, आनंद महाजन लक्ष ठेऊन होते.सात ग्रामपंचायतीसाठी झाल्या निवडणूक पाडळदा व बहिरपुर बिनविरोध झाल्या. पाच ग्रामपंचायतीत प्रभाग 16 मधील 39 जागा बिनविरोध झाल्या. 1 जागा रिक्त असून  15 सदस्य निवडून आले आहेत. थेट सरंपचपदी 2 महिला, 5 पुरूष निवडून आले.

अक्कलकुव्यातील 14 पैकी 10 ग्रा.पं.वर भाजपाचा दावा

नंदुरबार । प्रतिनिधी-अक्कलकुवा तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला असून त्यापैकी 10 ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात गेल्या असल्याचा दावा करण्यात आला आहे.ग्रामपंचायत निहाय निवडून आलेले सरपंच याप्रमाणे, पोरांबी-संगिता नरेश वळवी (492), घंटाणी- निशा योगेश पाडवी (348), विरपूर- संगूबाई भिमसिंग तडवी (415), कुकडीपादर- फत्तेसिंग देवल्या वसावे (711), भाबलपूर- चंपा श्रीकृष्ण पाडवी (466), भगदरी- प्रमिला दिनकर वसावे (1293), अक्कलकुवा- उषाबाई प्रविण बोरा (2957), खापर- करुणा देविदास वसावे (2341), डनेल- ममताबाई आपसिंग पाडवी (655), मोलगी- मनोज चमार्‍या तडवी (1564), मणिवेली-दिलवर नुरजी वळवी (754), बिजरीगव्हाण- रोशन दिनकर पाडवी (774), डेबरामाळ- भिमसिंग राज्या वळवी (565), अलिविहिर- किसन भामट्या नाईक (507) याप्रमाणे सरपंच निवडून आले आहेत.

राजविहिर गृपग्रामपंचायत सरपंचपदी काँग्रेसचे लहू पाडवी

मोदलपाडा-वार्ताहर ता.तळोदा तळोदा तालुक्यातील राजविहिर ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी काँग्रेसचे लहू रमण पाडवी हे दणदणीत विजयी झाले तर ग्राम पंचायत सात सदस्य विजयी झाले तर विरोधी पॅनलला दोन जागांवर समाधान मानावे लागले. थेट जनतेतून निवडण्याचा तालुक्यात पहिला सरपंचचा मान लहू पाडवी यांच्या रूपाने काँग्रेसला मिळाला आहे ते 450 मतांनी विजयी झाले.तळोदा तालुक्यातील राजविहिर ग्रुप ग्राम पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत दोन पॅनलमध्ये सरळ लढत झाली. सरपंच पदासाठी तिरंगी तर सदस्य पदासाठी सरळ लढत झाली. शनिवारी 79.60 टक्के मतदान झाले. आज तहसील कार्यालयात मतमोजणी सकाळी 9 वाजता झाली त्यात त्यात माजी पालकमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली व तळोदा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहिदास पाडवी यांच्या नेतृत्वाखाली पॅनलचे लोकनियुक्त सरपंचपदी लहू रमण पाडवी हे 450 मतांनी निवडून आले. सदस्यपदी वाड्या पाया पाडवी, सरवरसिंग बारक्या पाडवी, देवीनंदा संजय पाडवी, सोनी रोहिदास पाडवी, जगन्नाथ मानसिंग पाडवी, अलका अमीर पाडवी, छबिबाई प्रताप वळवी हे सात तर विरोधी पॅनलचे नितेश देविदास वसावे, शारदा प्रकाश नाईक हे दोन उमेदवार निवडून आले आहे. निवडीनंतर माजी पालकमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांच्या हस्ते सरपंच व ग्रा.पं. सदस्यांचे सत्कार करण्यात आला. यावेळी तळोदा तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहिदास पाडवी, माजी उपनगराध्य प्रकाश ठाकरे, प.स. सभापती सौ.शांतीबाई पवार, उपसभापती दीपक मोरे, नगरसेवक पंकज राणे, राजकुमार पाडवी, भगवान पाडवी, मंगलसिंग पाटील, सरवरसिंग पाडवी आदी उपस्थित होते. फटाक्यांची आतिषबाजी करून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला.

 

LEAVE A REPLY

*