नंदुरबार जिल्ह्यात मुद्रांक विक्री बंद

0

नंदुरबार । दि.09 । प्रतिनिधी-नंदुरबार जिल्हयातील आजपासून दस्तलिखानाचे कामकाज बंद बेमुदत मुद्रांक विक्री बंदी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र राज्यातील मुद्रांक विक्रेते व दस्तलेखनीक यांच्या प्रमुख मागण्या संदर्भात गेल्या दोन वर्षांपासून शासनाशी चर्चा झाली. अनेकदा निवेदन दिलीत. मंत्र्यांशी चर्चा झाली.

अद्याप पावेतो मागण्यांचा शासनाने कोणत्याही स्वरूपाची दखल घेतलेली नाही. गेल्या 50 वर्षांपासून शासन व जनतेतले दुवा म्हणून काम करीत असून शासनाची प्रत्येक योजना सर्वसामान्य जनतेला त्यांच्या बोलीभाषेत समजवून शासनाने कामे करत आलेलो आहोत व शासनाला महसूल गोळा करण्यास मदत केलेली आहे.

आम्हास शासनाच्या नविन प्रणालीत समाविष्ट करण्यासंदर्भात अनेक निवेदने आम्ही शासनाला यापुर्वी दिलेली आहेत. परंतु त्याचा आजपावेतो कापेणताही निर्णय झालेला नाही.

त्यामुळे राज्यपातळीवरील संघटनेसाठी पाठींबा राज्यात प्रचलित छापिल मुद्रांक विक्री व्यवस्था चालू ठेवून त्यावर मुद्रांत विक्रेत्यांना 10 टक्के मनोती मिळावी, राज्यात सुरू असलेली ई चलन तसेच ई एसबीटीआर ही प्रणाली अधिकृत मुद्रांत विक्रेते व दस्तलेखक यांच्यामार्फत राबविण्यात यावी, एएसपी ही प्रणाली विनाअट अधिकृत मुद्रांत विक्रेते व दस्तलेखक यांनाच मिळावी, मयत मुद्रांक विक्रेत्यांचे वारस व हक्काने परवाना मिळावा आदी मागण्या मान्य होण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा व्हावा अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*