नवापूर येथील खून प्रकरणी वडार समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0

नंदुरबार । दि.09 । प्रतिनिधी-तीन महिन्यापुर्वी नवापूर येथे वडार समाजातील युवकाच्या खून प्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करावी या मागणीसाठी आज नंदुरबार येथे मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.

वडार समाजातर्फे दि.18 ऑगस्ट रोजी गणेश सुरेश मंजुकर (21) रा.नवापूर हा वडार समाजातील युवक बेपत्ता झाला होत. त्या युवकाचे चार दिवसांनी उकाई धरणातील नवापूर पोलीस स्टेशन हद्दीतील बँक वॉटरमध्ये छीन्नविछीन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला.

सदर तरूणाचा चेहरा व शरीरावरील जखमेनुसार त्याचा अगोदर खून करून नंतर पाण्यात फेकलेले असल्यामुळे नवापूर पोलीस स्टेशनचे फिर्याद घेण्यास दिरंगाई केली व दि. 8 ऑगस्टच्या संघटनेच्या निवेदनानुसार मयत युवकाचे वडीलांची दि. 15 ऑक्टोबर रोजी फिर्याद नोंद केली.

आणि त्या फिर्यादीनुसार मयत युवक गणेश सुरेश मंजुळकर याचे इस्लामपूर येथील हुमेरा नावाच्या युवतीशी प्रेम संबंध असल्या कारणाने त्या सुड भावनेने तरूणीचे नातेवाईक यांनी यापुर्वी दि.18 जून रोजी कै. गणेश सुरेश मंजुळकरचा वनीता विद्यालयाच्या पाठीमागे गळा आवळून ठार मारण्याचा प्रकार केला होता व यापुर्वीही दोन तीन वेळा त्यांनी संबंधीत युवकाला ठार मारून बेपत्ता करण्याची दमबाजी देखील केलेली होती.

हा घटनाक्रम पाहता संशयीत आरोपी म्हणून युवकतीचे नातेवाईक वडील, काका व भाऊ अनिश, नासीर व मीर यांनी पोलीस स्टेशन नवापूरने अटक केली आहे.

या प्रकरणात मुख्य धागे हुमेरा ही तरूणीची व या प्रेम प्रकरणात सतत कै. गणेश सुरेश मंजुळकर व हुमेरा यांनी मदत करणारी विवाहित महिला सविता रामदास व तिचा तरूण मुलगा सोनु रामदास हे या घटनेचे सविस्तर माहिती देव शकतात कारण दि.14 ऑगस्ट रोजी कै. गणेश मंजुळकर बेपत्ता झाल्याच्या दिवशी मयत युवकाचे व सविता रामदास या दोघांमध्ये दुपारी 3 ते 5.30 दरम्यान सविताच्या मुलाचे वाढदिवसानिमित्त व हुमेरा विषयी बोलने झाल्याचे मोबाईल संभाषणाच्या ध्वनीफीतवरून पुर्णपणे कळते असे मयत तरूणाचे वडील सुरेश मंजुळकर यांचे म्हणणे आहे.

या खूनात अजून काही गुन्हेगार अडकले असून त्यांची अद्याप पावेतो अटक झालेली नाही. या प्रकरणातील मुळ हुमरा तसेच विवाहित महिला सविता रामदास व तिचा मुलगा सोनु रामदास हे महत्वाचे धागे दोरे असल्याने त्यांना चौकशी कामी ताब्यात घेतला असता या प्रकरणाची खरी सत्यता बाहेर येईल व ही हकीगत वर नमुद केल्यानुसार हुमेरा, सविता तसेच सोनु हे सुध्दा आरोपी म्हणून निष्पन्न होतील.

सदरची घटना ही परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारीत असून त्याचा तपास योग्य रितीने होणे आवश्यक असल्याने या घटनेचा तपास हा सीआयडीमार्फत द्यावा.

जोपर्यंत चौकशी व तपास पूर्ण होत नाही तोपर्यंत आरोपींना कुठल्याही प्रकारची जामीन होवू नये तसेच जामिनीवर लवकर मुक्तता झाल्यास चौकशी अपूर्ण राहण्याची शक्यता नाकारता येत नाही व त्यातून आरोपींना निर्देश सुटण्यास वाव मिळेल आणि गणेश मंजुळकर या युवकास न्याय मिळण्यापासून वंचीत होईल.

निवेदनावर वसंत गुंजाळ, राजेंद्र गुंजाळ, पोपटराव शिंदे, धनराज कातोरे, राहुल सुर्यवंशी, राजेश शिंदे, अंबादास आतरकर, रतिलाल शिंदे, नाना शिंदे, दिपक शिंदे, अशोक वैदु, साहेबराव शिंदे, गंगाराम पवार, नरेश शिंदे यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

LEAVE A REPLY

*