नंदुरबार तालुक्यात ग्रा.पं.साठी 77 टक्के मतदान

0

नंदुरबार । दि.7 । प्रतिनिधी-तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींची निवडणुक प्रक्रिया शांततेत पार पडली. आज सायंकाळपर्यंत एकूण 77.5 टक्के मतदान झाले. 23 हजार 75 मतदारांपैकी 17 हजार 779 मतदारांनी आपला मतदाराना हक्क बजावला. त्यात महिला मतदार 9 हजार 631 तर पुरूष मतदार 9 हजार 48 होते.

ग्रामपंचायतनिहाय झालेले मतदान असे आसाणे एकूण मतदार 1 हजार 619 त्यापैकी झालेले मतदान 1446, त्यात महिला 668 तर पुरूष 778, एकूण 89.31 टक्के मतदान झाले.

अमळथे एकूण मतदार 337 झालेले मतदान 346, महिला 159, पुरूष 187 एकूण मतदान 94.28 टक्के,
चौपाळे एकूण मतदान 2810 त्यापैकी झालेले मतदान 2 हजार 159, महिला 1043, पुरूष 1016, एकूण टक्केवारी 76. 83 टक्के,
ढंढाणे एकूण 912, झालेले मतदान 707 महिला 365, पुरूष 395, एकूण मतदान 83.33 टक्के,
धानोरा एकूण 3 हजार 621 झालेले मतदान 3 हजार 4, महिला 1585, पुरूष 1417 एकूण टक्केवारी 82.96,
घोटाणे एकूण मतदान 1756 झालेले मतदान 1532, महिला 741, पुरूष 791, एकूण मतदान 87.34 टक्के,
खैराळे एकूण मतदार 1745 झालेले मतदान 1363, महिला 695, पुरूष 688 एकूण टक्केवारी 81.11 टक्के.
कोठडे एकूण मतदार 950 झालेले मतदान 833, महिला 413, पुरूष 420,
ओसर्ली एकूण मतदार 946, झालेले मतदान 744, महिला 360, पुरूष 384 एकूण टक्केवारी 78.65 टक्के,
रजाळे एकूण मतदार 1766 झालेले मतदान 1532, महिला 726, पुरूष 806, एकूण 86.75 टक्के,
सातुर्खे एकूण मतदार 667, झालेले मतदान 545, महिला 268, पुरूष 277, एकूण टक्केवारी 81.71 टक्के,
रनाळे एकूण मतदार 5 हजार 956 झालेले मतदान 3 हजार 495 महिला 1606 पुरूष 1889, एकूण मतदान 58.68 टक्के याप्रमाणे सर्व ठिकाणी मतदार झाले.

दि. 9 ऑक्टोंबर रोजी मत मोजणी नंदुरबार येथील नविन तहसिल कार्यालयात सकाळी 6 वाजता सुरू होणार असून त्यासाठी प्रशासनातर्फे तयारी पूर्ण करण्यात आली आहे. वाहतुक विभागातर्फे गिरीविहार गेट ते सीबी पेट्रोल पंपापर्यंत वाहतुकीसाठी रस्ता या कालावधीत बंद राहणार आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक गिरीष पाटील यांनी दिली.

LEAVE A REPLY

*