अंत्योदय एक्सप्रेस आजपासून

0

नंदुरबार । दि.7 । प्रतिनिधी-उधना-जयनगर-उधना या अंत्योदय एक्सप्रेसचे उद्या दि. 8 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे.

या रेल्वे एक्सप्रेसला खान्देशातील नंदुरबार, अमळनेर, जळगाव व भुसावळ या चारही मोठया रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आला आहे.

जयनगर-उधना या दरम्यान एक नवीन साप्ताहिक रेल्वे एक्प्रसेस गाडी अंत्योदय एक्सप्रेस नावाने उद्या दि. 8 रोजी सुरु होत आहे. या रेल्वे एक्सप्रेसचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भरुच (गुजरात) येथून रिमोटच्या साहयाने हिरवी झेंडी दाखवून करण्यात येणार आहे.

ही रेल्वे जयनगर येथून दि.13 ऑक्टोबर रोजी प्रत्येक शुक्रवारी तसेच दि. 15 ऑक्टोबरपासून उधना येथून प्रत्येक रविवारी धावणार आहे. 15663 जयनगर-उधना अंत्योदय एक्सप्रेस दि.13 रोजी प्रत्येक शुक्रवारी निघेल, 1.20 वाजता वलकर, 2.55 ला दरभंगा, 4.25 ला समस्तीपूर, 5.55 ला बरौनी, 7.20 ला मोकामा, 10 वाजता पटणा, 11 वाजता आरा, 11.58 ला बक्सर, 13.40 ला मगलसराय या मार्गाने शनिवारी 13 वाजता उधना येथे पोहचेल.

परत 15664 ही उधना-जयनगर अंत्योदय एक्सप्रेस दि. 15 ऑक्टोबर पासून प्रत्येक रविवारी 8.50 वाजता उधना येथून सुटेल.

सोमवारी 11 वाजता मुगलसराय, 12.20 ला बक्सर, 13.14 ला आरा, 15.00 वाजता पटणा, 16.24 ला मोकामा, 17.25 ला बरौनी, 19.00 वाजता समस्तीपूर, 20.15 ला दरभंगा, 22.40 ला जयनगरला पोहचेल.

अंत्योदय एक्सप्रेस आम जनतेसाठी लांबपल्ल्याची तसेच पूर्णपणे अनारक्षित सुपरफास्ट रेल्वे आहे. यात आराम सीट, सामानासाठी रॅक, पेयजलाचे मशिन, मोबाईल चार्जींग, मॉडयुलर शौचालय, एलईडी लाईट अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

अप व डाऊन या दोन्ही दिशांना उपरोक्त स्टेशनाव्यतिरिक्त मिर्जापूर, छेवकी, शंकरगढ, सतना, कटनी, जबलपूर, नरसिंहपूर, पिपरीया, इटारशी, हरदा, खण्डवा, भुसावळ, जळगाव, अमळनेर व नंदुरबार या स्टेशनवर थांबणार आहे.

या एक्सप्रेसमध्ये साधारण श्रेणी 16 तसेच 02 एसएलआर कोचसह एकुण 18 कोच राहणार आहेत. या एक्सप्र्रेसचे प्रवासी भाडे कमी असून राजधानी एक्सप्रेसच्या गतीने धावणारी रेल्वे आहे.

130 किमी प्रति तासच्या वेगाने ही रेल्वे धावणार आहे. अत्यंत आरामदायी रेल्वे आहे. कोचमध्ये सामान ठेवण्यासाठी बनविण्यात आलेल्या रॅकमुळे सामानाचे कुठलेही नुकसान होणार नाही. या रेल्वे एक्सप्रेसचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्या उद्घाटन होणार आहे.

LEAVE A REPLY

*