युती किंवा आघाडी नाही ! काँग्रेस पक्ष स्वबळावर लढेल : माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी

0

तळोदा । दि.06 । ता.प्र./श.प्र.-येथे आगामी नगरपालिका निवडणूकीत कोणत्याच पक्षाजवळ युती किंवा आघाडी केली जाणार नाही, निवडणूक स्वबळावर लढविली जाईल. नगराध्यक्ष पदासह संपूर्ण पॅनल विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे, असे आवाहन माजीमंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी केले.

तळोद्यातील संत सावता भवन येथे आज पालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.

अध्यक्षस्थानी माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी तर प्रमुख अतिथी म्हणून आ.चंद्रकांत रघुवंशी, उमवि सिनेट सदस्य तथा प्रतोद भरत माळी, नगराध्यक्षा सौ. रत्नाताई चौधरी, सुभाष चौधरी, कुणाल वसावे, राजेंद्र माळी, सुधीरकुमार माळी, सतीश वळवी, आकाश वळवी, नरहर ठाकरे, उखा पिंपरे, नरेश पवार, प्रा. सुनील गोसावी, किशन कलाल, नंदूगिर गोसावी, भगवान चौधरी, दीपक मोरे आदी व्यासपीठावर उपस्थित होते. त्यावेळी अ‍ॅड.वळवी बोलत होते.

अ‍ॅड. पद्माकर वळवी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, काँग्रेस पक्ष गोरगरीबांचा पक्ष आहे. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूरांच्या पाठीशी राहतो.

आगामी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी कोणाचेच तिकीट फिक्स झाले नाही आहे, सर्वच इच्छुकांनी तिकिटांसाठी पक्षांकडे मागणी करावयाची आहे.

तळोद्यात कोणत्याच पक्षाजवळ युती किंवा आघाडी केली जाणार नाही, निवडणूक स्वबळावर लढविली जाईल आणि निवडणूकीत काँग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष आणि संपूर्ण पॅनल विजयी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले की, भारतीय काँग्रेस पक्ष हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. तळोदा शहरात विकासाची अनेक कामे होत आहेत, नंदुरबार जिल्ह्यात नंदुरबार नगरपालिका नंतर सर्वात जास्त विकासकामे ही तळोदा नगरपालिका करीत असून जनता हे सर्व जाणून आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत परत एकदा काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

तळोदा नगरपालिकेचे उत्पन्न कमी असतांना कामे जोमाने करीत आहे. शहराचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आहे. ते मुंबई वार्‍याकरून निधी आणतात, जिद्दीने काम करत असतात म्हणून नगरपालिका अ वर्ग असतांना जेवढी कामे झाली नाहीत तेवढी कामे क वर्ग नगरपालिका तळोद्याने केली.

मंत्रालयात जो फिरतो त्यांना सहकार्य मिळत असते. आतापर्यंत 100 कोटीचे कामे नंदुरबारात झाली आहेत. निवडणूकीत आम्हाला सहकार्य करा, पक्षाशी माझी बांधिलकी आहे.

जिल्हा नियोजनातून विज निर्मिती करून पाणी पुरवठा वेगळी लाईन केली जाईल. फिल्टर पाण्याचा गैरवापर करू नका. तसेच हातोडा पुलाला कायम बंदोबस्त देण्याचे आश्वासन आ.रघुवंशी यांनी दिले.

यावेळी भरत माळी यांनी सांगितले की, गेल्या पांच वर्षांत शहरातील नागरिकांची कामे केल्यामुळे पक्षाचा विजय निश्चित आहे. शहरातून गावगुंड हद्दपार करावे व लोकहीतवादी शांततावादी लोकाची सत्ता असल्यास सर्वत्र शांतता नांदू शकते म्हणून लोकांनी विचारपूर्वक अश्या सामाजिक शांतता प्रस्थापित करणांर्‍या लोकांना व पक्षालाच निवडून द्यावे असे आवाहन भरतभाई माळी यांनी भावनाविवश होऊन केले.

यावेळी तळोदयातून संस्थाचालक गटातून प्रथमच भरतभाई माळी व प्राध्यापक गटातून प्रा. सुनील गोसावी असे एकाच वेळी दोन व्यक्ती सिनेट सदस्य म्हणून निवडून आले आहेत ,त्यांचा जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

मेळाव्याचे प्रास्ताविक प्रकाश ठाकरे यांनी केले. सूत्रसंचलन व आभारप्रदर्शन अविनाश मराठे यांनी केले. यावेळी सतीवन पाडवी, गौतम जैन, बापू कलाल, जितेंद्र माळी, रोहित माळी, अरविंद पाडवी, नारायण माळी, अनिल माळी, पुंडलिक भोई, सुनील माळी, महेशकुमार राणे, मुरलीधर सागर, भालचंद्र सुर्यवंशी, माजी उपनगराध्यक्ष गौरव वाणी, दिवाकर पवार, अरविंद मगरे, उद्धव पिंपळे, अरुण माळी, रामदास चौधरी, किशोर माळी, भिका कुरेशी, गुट्टू पठाण, ईश्वर माळी, लक्ष्मण निमेश सुर्यवंशी, अजित टवाळे, विनोद पवार, कुणाल चौधरी, सुनिल कर्णकार माळी, आदील शेख, युसूफ पठाण, दिपक मोरे, चंदू भोई, संजय वाणी, अरुण मगरे, लुकमान कुरेशी, नबिखा कुरेशी, रझाक पठाण, शांताराम माळी, अरुण पाडवी, लक्ष्मण पाडवी, कृष्णा पाडवी आणि काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळावा यशस्वी करण्यासाठी नगरसेवक संजय माळी, गौरव वाणी, पंकज राणे तसेच विकासदीप राणे, दगुलाल माळी, कल्पेश माळी आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

सकाळी मेळाव्यापूर्वी उपस्थित जनता, पक्षाचे कार्यकर्ते ,पदाधिकारी यांची छोटेखानी मिरवणुक देखील काढण्यात आली. त्यास व मेळाव्यास उपस्थित प्रचंड जनसमुदायामुळे काँग्रेसच्या गोटात उत्साह़ संचारला आहे.

 

LEAVE A REPLY

*