नवापूर । दि.06 । प्रतिनिधी-राज्य सरकारच्या विरोधात आज येथील राष्ट्रीय महामार्गावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

या रास्तारोको आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. चार ते पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा होत्या. यावेळी आंदोलकांना अटक करुन सुटका करण्यात आली.

शहरात आज नवापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सर्वप्रथम महामानव डॉ.आंबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात करण्यात आली.

मोर्चा बसस्थानक, साई मंदीर रोड, कॉलेज रोड या मार्गाने सरळ महामार्ग 6 वरील उपजिल्हा रुग्णालयासमोर नेवून तेथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

‘या सरकारचे करायचे काय-खालती डोके वरती पाय’ अशा घोषणा करण्यात आल्या. तसेच अच्छे दिनचे स्वप्न दाखवणारा भाजप बुरे दिन दाखवत आहे.

कधी नव्हे एवढी वाईट अवस्था शेतकरी व सर्व सामान्य जनतेची भाजप सरकारने केली आहे. भाजपा सरकार हे मोठ्या उद्योगपतींचे आहे.

यावेळी राष्ट्रवादीचे माजी आमदार शरद गावीत, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष राजेंद्र गावीत, जिल्हा उपाध्यक्ष राया मावची, नंदुरबार तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, तालुकाध्यक्ष विनायक गावीत, न.पा. विरोधी पक्षनेता नरेंद्र नगराळे, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष इम्तीयाज लाखाणी, जिल्हा सरचिटणीस अमृत लोहार, सुनिल वसावे, मनोज वळवी, शरद पाटील, नगरसेवक शिरीष प्रजापत, यशवत गावीत, भिकु कोकणी, उमेश गावीत, हरीश पाडवी, जेन्या गावीत, संजय शिंदे सह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त उपस्थित होते.

रास्ता रोको आंदोलन अर्धा तास सुरु होते. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन विसरवाडी व सोनगडपर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. आंदोलन आक्रमक होत होते.

अखेर त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, संतोष भंडारे, संगिता कदम यांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस गाडीने नवापूर पोलिस स्टेशन येथे आणुन 68,69 प्रमाणे कारवाही करुन सोडण्यात आले.

यानंतर नायब तहसिलदार व उपविभागीय पोलिस अधिकारी पवार यांना निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये म्हटले की, शेतकर्‍यांच्या शेतीमालास हमी भाव मिळाला पाहिजे.

शेतकर्‍यांची संपुर्ण (सरसकट) कर्जमाफी झाली पाहिजे. पेट्रोल, डिझेल व कुकिंग गॅसची मोठया प्रमाणावर झालेली दर वाढ कमी केली पाहिजे. महागाई कमी झाली पाहिजे या मागण्या पुर्ण झाल्या पाहिजे.असे निवेदना मध्ये म्हटले आहे.

आंदोलनामध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणुन उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक दिपक पाटील, संतोष भंडारे, ताथु निकम, बबन सुर्यवंशी, संगिता कदम, पो.कॉ.निजाम पाडवी, योगेश थोरात, अनिल राठोड, रितेश इंदवे, वसंत नागमल, अनिल राठोड, मोहन साळवे, भिमराव बहिरम, देविदास सुर्यवंशी, दिलीप तडवी, तोरन नाईक, धनजंय पवार आदींनी चोख बंदोबस ठेवला होता.

 

LEAVE A REPLY

*