आंतरमहाविद्यालयीन तायक्वांदो निवड स्पर्धा

0

नंदुरबार । दि.06 । प्रतिनिधी-येथील जिजामाता महविद्यालालय येथे उ.म. विद्यापीठाच्या आंतर महाविद्यालयीनस्तरीय तायक्वांदो स्पर्धा निवड चाचणी आयोजित केली.

स्पर्धेचे उद्घाटन जिजामाता शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.अभिजीत मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहूणे म्हणून क्रिडा संचालक डॉ. विजय पाटील, प्रा.एम.वाय. चव्हाण, डॉ.नरेश बागल उपस्थित होते. महाविद्यालयाचे क्रिडा संचालक डॉ.ईश्वर धामणे यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

स्पर्धेकरीता उ.म. विद्यापीठातील विविध महाविद्यालयाचे हे क्रिडा संचालक डॉ. भरत वळवी, प्रा.अरविंद कांबळे, प्रा.प्रशांत माळी, प्रा.अशोक भदाणे, प्रा.तारकदास, डॉ.व्ही.एल. पाटील, प्रा.नितीन वाळके, डॉ. के.डी. बोरसे, प्रा.राजेंद्र पगारे, प्रा.संजय भावसार, प्रा.महेश पाटील, डॉ.गोविंद मारतळे आदी संघा समवेत उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी पंच म्हणून सरूत येथील विकघास कुमार, सुरेश गावित, कल्पेश नायका, अमन मिस्त्री, जावेद बागवान यांनी काम पाहिले.

सुत्रसंचालन प्रा.अरविंद कांबळे यांनी तर आभार डॉ.ईश्वर धामणे यांनी व्यक्त केले. या स्पर्धेसाठी नंदुरबार, धुळे, एरंडोल व जळगांव विभागातील विविध महाविद्यालयाच्या खेळाडू उपस्थित होते.

तंबाखू मुक्त जीवनाची प्रतिज्ञा
येथील डॉ.काणे गर्ल्स हायस्कुल येथे तंबाखू मुक्त जीवनाची प्रतिज्ञा घेण्यात आली. शाळा व शाळा परिसर तंबाखू मुक्त करण्याच्या संकल्प करून प्रतिज्ञा घेण्यात आली. मुख्याध्यापिका सौ.भारती सुर्यवंशी यांनी सदर प्रतिज्ञा दिली. पर्यवेक्षक नारायण भदाणे यांनी आरोग्य दृष्टीने तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम व शरिरावर होणारे परिणाम त्याचबरोबर तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांमुळे परिसरात होणारी अस्वच्छता याविषयी माहिती सांगितले.

 

LEAVE A REPLY

*