रासायनिक खत विक्रीसाठी पॉस अनिवार्य : अन्यथा कारवाई होणार – कृषि विभाग

0

नंदुरबार । दि.06 । प्रतिनिधी-रासायनिक खतविक्रीसाठी पारदर्शकता येण्यासाठी या वर्षापासून अधिकृत विक्रेत्यांना पॉस मशीन देण्यात आली आहेत.

मात्र अनेक विक्रेते जुन्या पद्धतीने खतविक्री करीत असल्याने त्यांच्या जिल्हा परिषदेचा कृषि विभाग कारवाई करणार असल्याची माहिती कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे यांनी दिली आहे.

खतविक्रीमध्ये पारदर्शकता आणि अनुदानित खत लाभार्थी शेतकर्‍यापर्यंत पोहचविणे आणि थेट लाभ हस्तांतर पद्धत सुरु करण्यात आली.

ङ्गपॉसफ मशिनच्या आधारे रासायनिक खत विक्री करण्यासाठी जिल्ह्यातील अधिकृत खत विक्रेत्यांना प्रशिक्षण देण्यात आले. त्यासाठी 158 अधिकृत खतविक्रेत्यांना ङ्गपॉसफ मशिनचे वितरण करण्यात आले.

केंद्र शासनाच्या रासायनिक खते विभागाकडील सुचनांनुसार पॉस मशिनद्वारे रासायनिक खतांची विक्री करणे अविनार्य असून असे न करणार्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचे विभागाने आदेशित केलेले आहे.

जिल्ह्यातील अधिकृत खतविक्रेत्यांना ङ्गपॉसफ मशिन पद्धतीने खतविक्री करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा खतविक्रेत्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

ङ्गपॉसफ मशिन उपलब्ध असलेल्या खतविक्रेत्यांनी नवीन पद्धतीने खत विक्री करावी, अन्यथा संबंधितांचे खतविक्रीचे परवाने निलंबित करण्यात येतील.

घाऊक खतविक्रेत्यांनी किरकोळ खत विक्रेत्यांना मशिनद्वारेच खतविक्री करीत असल्याची खात्री करावी, तसेच कंपनीने पुरवठा केलेली खते मशिनद्वारे विक्री होतील याची संबंधित प्रतिनिधींनी दखल घ्यावी.

पॉस मशिनशिवाय विक्री होणार्‍या खताच्या अनुदानाची जबाबदारी उत्पादक कंपनीची राहणार आहे. तसेच रासायनिक खते खरेदी करतांना ग्राहकांना शेतकर्‍यांना आधार क्रमांक देणे बंधनकारक असल्याने रासायनिक खते खरेदी करण्यासाठी येतांना शेतकर्यांनी आपले आधार क्रमांक सोबत आणावा, असे आवाहन कृषि विकास अधिकारी प्रदीप लाटे यांनी केले आहे.

दरम्यान, खतविक्रेत्यांनी पॉस मशिनद्वारेच विक्री करावी. अन्यथा कृषि विभागाच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा कृषि विकास अधिकारी यांनी दिला आहे.

 

LEAVE A REPLY

*