तीन तोळ्याची सोनपोत लंपास

0

शहादा । दि.5 । ता.प्र.-येथील प्रकाशा रोडलगत स्वामी विवेकानंद बसस्थानकासमोर अंगणात उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची तीन तोळ्याची पोत दोन युवकांनी पळवून नेली. यावेळी झालेल्या झटापटीत महिला जखमी झाली आहे. ही घटना आज दुपारी 1 वाजून 40 मिनीटांनी घडली.

याबाबत अधिक वृत्त असे की, नवीन प्रकाशा रोडलगत स्वामी विवेकानंद बसस्थानकासमोर सप्तश्रृंगी नगरात राहणार्‍या सुनिता मुकुंद बोराटे ही महिला अंगणात उभी होती.

दुपारी पावणेदोन वाजेच्या सुमारास दोन युवक तोंडावर रुमाल बांधून समोरून येत होते. त्यातील एकाने चॉकलेटी कलरचा टी शर्ट तर दुसर्‍याने काळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला होता.

हे युवक समोर जात असतांना अंगणात उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातून सोन्याची पोत तोडून पळ काढल्याने महिलेने त्याचा हात धरला.

महिलेस पोतसह पाच-सहा मीटर फरफटत नेले व तीन ग्रॅम सोन्याची पोत बाजारभाव रुपये 90 हजार किंमतीचे पोत घेवून युवक पोबारा झाले. भरदुपारी वसाहतीत झालेल्या घटनेमुळे चैन स्नॅचिंगच्या घटनेने महिला भयभित झाल्या आहेत.

 

LEAVE A REPLY

*