पालिकेच्या सर्वसाधारण सभेत पाच विषयांना मंजुरी

0

नंदुरबार । दि.22 । प्रतिनिधी-नंदुरबार नगर परिषदेची सर्व साधारण सभा आज छत्रपती शिवाजी महाराज नाटय मंदिरात घेण्यात आली. या सभेत पाच विषयांवर चर्चा करून अवघ्या पाच मिनीटात मंजूरी देण्यात आली.

नंदुरबार नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी येणार्‍या अंदाजे खर्चास मंजूरी देण्यात आली.

तसेच सन 2017- 18 या आर्थिक वर्षात छपाई स्टेशनरी या साहित्य खरेदीसाठी येणार्‍या खर्चास मान्यता देण्यात आली.

नंदुरबार नगर पालिकेच्या हद्दीतील विविध रस्त्यावरील खड्डे मुरूम व खडी बुजविण्यासाठी निविदा मागविण्यात येवून त्याबाबत निर्णय घेण्यात आला.

पालिकेच्या ई लायब्ररीसाठी दोन शिटर्स लोखंडी बाक खरेदीसाठी करण्यासाठी मागवलेल्या निविदेवर निर्णय घेण्यात आला.

तसेच कोरीट रोडवरील पाया स्टेशनजवळील चौकात संगीत वाद्याचे शिल्प पुरवठया करण्यासाठी हेल्पमॅन शिल्प पुरठा करण्यासाठी निविदा मागविण्यात त्या निविदेवर निर्यय घेण्यात आला.

या सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा सौ.रत्ना रघुवंशी उपस्थित होत्या. तसेच उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, सर्व सभापती, नगरसेवक, कार्यालय अधिक्षक मच्छिंद्र गुलाले आदी यावेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*