स्व.अण्णासाहेबांना स्मृतीदिनानिमित्त श्रद्धांजली

0

शहादा । दि.18 । ता.प्र.-सहकार व शिक्षणमहर्षि स्व. अण्णासाहेब पी. के. पाटील यांच्या तृतीय स्मृती दिनानिमित्त आज त्यांच्या स्मृती स्थळी विविध सामाजिक, राजकीय पदाधिकारी आणि संस्थांतर्फे श्रध्दांजली वाहण्यात आली.

येथील पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळाच्या प्रशासकिय इमारतीसमोर असलेल्या स्व. अण्णासाहेब यांच्या स्मृतीस्थळी श्रध्दांजली वाहण्यासाठी सकाळपासून नागरीकांची रिघ लागली होती.

सकाळी अण्णासाहेबांच्या अर्धांगीनी श्रीमती कमलताई पाटील, बंधु एन.के. पाटील, सुपुत्र दीपक पाटील, सून कंचनताई पाटील, नात यामिनी पाटील, पुतणे मकरंद पाटील, मुलगी ज्योतीबेन पाटील, जावई पी.आर.पाटील यांच्यासह कुटुंबीयांनी पुष्पचक्र अर्पण करीत श्रध्दांजली वाहिली.

तदनंतर संस्थेचे उपाध्यक्ष किशोर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, समाज कल्याण सभापती आत्माराम बागले, पंचायत समितीचे माजी सभापती माधव पाटील, बाजार समितीचे सभापती सुनिल पाटील, उपसभापती रविंद्र राऊळ, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजाराम पाटील, उपाध्यक्ष जगदिश पाटील, माजी अध्यक्ष विजय पाटील, सुतगिरणीचे उपाध्यक्ष रोहिदास पाटील, सातपुडा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रेमसिंग अहेर, उपनगराध्यक्षा रेखाबाई चौधरी, शिक्षण सभापती उषाबाई कुवर, माजी नगराध्यक्ष विजय पाटील, हैदरभाई नुराणी, संजय चौधरी, राकेश पाटील, यशवंत चौधरी, प्रा. एल. एस. सैय्यद, डॉ. अजहर पठाण, निहाल अन्सारी, लक्ष्मण बढे, अखलाक अन्सारी आदीसह विविध राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आदरांजली वाहिली.

LEAVE A REPLY

*