नर्मदा नदीत स्नानासाठी आलेल्या भाविकांची बोट उलटली : पाच जणांना जलसमाधी

0

नंदुरबार | प्रतिनिधी- मकरसंक्रांतीनिमित्त नर्मदा नदीवर आंघोळीसाठी आलेल्या भाविकांची बोट उलटल्याने सुमारे ५ जणांना जलसमाधी मिळाली असून ३५ जणांना वाचवण्यात यश आले आहे.

मकरसंक्रांतीच्या दिवशी नदीचे पूजन करुन आंघोळ करण्यास महत्व आहे. यासाठी दरवर्षी जिल्हयातील नर्मदा, तापी या मोठया नद्यांवर लाखो भाविक नदीपूजन व आंघोळीसाठी येत असतात. दरम्यान, आज भुषा (ता.धडगाव) येथे असलेल्या नर्मदेच्या विशाल नदीपात्रात भाविक आंघोळीसाठी आले होते.

एका खाजगी बोटीत सुमारे ४० जण नर्मदेतून जात असतांना जास्त वजनामुळे बोट नदीत उलटली. त्यामुळे बोटीतील सर्वच प्रवासी नदीपात्रात पडले. त्यांना तातडीने मदतकार्य सुरु झाले. आतापर्यंत ५ मृतदेह सापडले असून सुमारे ३५ जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले आहे.

मात्र, बोटीत किती प्रवासी होते याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. वाचवण्यात आलेल्या प्रवाशांशी प्रकृतीही गंभीर आहे. त्यांना धडगाव येेथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी तीन तरंग रूग्णावहिका व आठ १०८ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून मदतकार्य सुरुच आहे.

LEAVE A REPLY

*